शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
4
"माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
5
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
6
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
7
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
8
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
9
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
10
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
11
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
12
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
13
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
15
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
16
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
17
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
18
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
19
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
20
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात सोयाबीनच्या सुड्या जळण्याचे सत्र, शेतकऱ्यांचे जागरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 12:49 IST

वाशिम : जिल्ह्यात सोयाबीन काढणी जोरात सुरू आहे; परंतु मळणी यंत्र उपलब्ध होत नसल्याने शेतकरी सुड्या लावून ठेवत असताना काही ठिकाणी सोयाबीनच्या सुड्या जळण्याच्या घटना घडल्या आहेत.

ठळक मुद्देरिसोड तालुक्यात सोयाबीनच्या सुड्या जळण्याच्या दोन घटनांत ५० क्ंिवटलहून अधिक सोयाबीन खाक झाले आहे.पिकाची राखरांगोळी होऊन आर्थिक संकट कोसळू नये, या भितीपोटी शेतकरी रात्रीच्या वेळी सोयाबीनच्या सुड्यांची रखवाली करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात सोयाबीन काढणी जोरात सुरू आहे; परंतु मळणी यंत्र उपलब्ध होत नसल्याने शेतकरी सुड्या लावून ठेवत असताना काही ठिकाणी सोयाबीनच्या सुड्या जळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण असून, नुकसान टाळण्यासाठी शेतकरी सोयाबीनच्या सुड्यांच्या रखवालीसाठी जागरण करीत आहेत. जिल्ह्यात गत काही वर्षांत या पिकाचा पेरा एकूण क्षेत्राच्या ७५ टक्क्यांहून अधिक होत आहे. यंदाही जिल्ह्यात ३ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झालेली होती. त्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र तब्बल २ लाख ८७ हजारांहून अधिक होते. आता हे पीक काढणीवर आले आहे.  उन्हाचा पारा वाढत असल्याने पूर्णपणे सुकलेल्या सोयाबीनच्या शेंगा फुटून दाणे खाली पडत असल्याने शेतकरी कापणीची घाई करीत आहेत. एकाचवेळी अनेक शेतकºयांकडून मजुरांची मागणी होत असल्याने शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच कापून ठेवलेले सोयाबीन काढण्याचीही घाई असल्याने मळणीयंत्रांची मागणी वाढल्याने ते मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे शेतकरी सोयाबीनच्या सुड्या लावून ठेवत आहेत. त्यातच सुड्या जळण्याच्या घटना घडत असल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण आहे. गत तीन दिवसांत रिसोड तालुक्यात सोयाबीनच्या सुड्या जळण्याच्या दोन घटनांत ५० क्ंिवटलहून अधिक सोयाबीन खाक झाले आहे. राबराब राबतानाच मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानंतर हाताशी आलेल्या पिकाची राखरांगोळी होऊन आर्थिक संकट कोसळू नये, या भितीपोटी शेतकरी रात्रीच्या वेळी सोयाबीनच्या सुड्यांची रखवाली करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी