शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

कारखेडा जिल्हा परिषद शाळेत ‘सेमी इंग्रजी’; विद्यार्थ्यांची झाली सोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 16:34 IST

शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी घेतलेला पुढाकार कौतुकाचा विषय ठरला आहे.

- बबन देशमुखलोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षण द्यावे तसेच शहरी भागाकडे जाणाºया विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेतही दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळू शकते, हे पटवून देण्यासाठी मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत यावर्षीपासून सेमी इंग्रजीच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी घेतलेला पुढाकार कौतुकाचा विषय ठरला आहे.तालुक्यातील कारखेडा येथील जि.प. शाळेत इयत्ता एक ते चार वर्ग असुन पटसंख्या १०० आहे. संपुर्ण चारही वर्ग डिजीटल आहे. शिक्षकांनी यार्षीपासुन अभिनव मोहीम हाती  घेतली. गावातील अनेक विद्यार्थी मानोरा शहराकडे शिक्षणासाठी धाव घेत आहेत. इंग्रजी, सेमी इंग्रजी शिक्षण शहरातच मिळते, ग्रामिण भागात मिळत नाही, असा पालकांचा समज आहे. हा समज खोडून काढण्यासाठी तसेच जि.प. शाळेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक गोविंद पोतदार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष मिना विनोद ढोके व सदस्य, शिक्षक रणजित जाधव, उषा शिंदे व कविता चौधरी यांनी स्वयंस्फुर्तीन एक ठराव घेऊन, जिल्हा परिषदेकडे सेमी इंग्रजी शिक्षणाची मान्यता मागीतली. परंतु काही तांञीक अडचणीमुळे मान्यता देण्यात अडचण होती. तरीसुद्धा शिक्षकांनी पालक व गावातील काही मंडळींना विश्वासात घेऊन गावातील विद्यार्थी घडावा यासाठी स्वत: सेमी इंग्रजीला सुरूवात  केली. त्यासाठी लागणारे पुस्तके अमरावती येथून बोलावण्याचा संकल्प केला. त्यामुळे पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी जि.प. शाळेकडे पालकांचा कल वाढत आहे. लोकवर्गणीचाही संकल्पजि.प. शाळेत कार्यरत शिक्षक रणजित जाधव हे बिएससी, एम.एड. आहेत.  त्यांच्या शिक्षणाचा फायदा विद्यार्थी घडविण्यासाठी होऊ शकतो. इंग्रजी. जि प शिक्षकानी घेतलेल्या निर्णयाचे गावकºयांनी स्वागत केले आहे. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी पहील्या वर्षी किमान ५० हजार रुपये लोकवर्गणी जमा करण्याचा संकल्प केला. 

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र