शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

बचत गटाच्या महिलांचा गाव हगणदरी मुक्तीचा संकल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 2:08 PM

मानोरा : प्रशासनाच्यावतिने गावे हगणदारीमुक्त करण्यासाठी विविध क्लुप्त्या लढविल्या जात आहेत. तरीही गाव हगणदरीमुक्त होण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागत आहेत. अशातच मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील २० बचत गटाया महिलांनी गाव हगणदारीमुक्तीचा संकल्प केला आहे. केवळ संकल्पच महिलांनी केला नसून ३१ आॅगस्टपर्यंत ते उदिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार केल्याने या महिलांचे परिसरात ...

मानोरा : प्रशासनाच्यावतिने गावे हगणदारीमुक्त करण्यासाठी विविध क्लुप्त्या लढविल्या जात आहेत. तरीही गाव हगणदरीमुक्त होण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागत आहेत. अशातच मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील २० बचत गटाया महिलांनी गाव हगणदारीमुक्तीचा संकल्प केला आहे. केवळ संकल्पच महिलांनी केला नसून ३१ आॅगस्टपर्यंत ते उदिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार केल्याने या महिलांचे परिसरात कौतूक केल्या जात आहे.

गावागावात अनेकांच्या घरी शौचालये असतांना ते उघडयावर जातात तर काही जण शौचालय बांधण्यास टाळाटाळ करतांना दिसून येत आहेत. गावातील नागरिकांनी गाव हगणदारी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला यावेळी बचत गटाच्या महिला स्वताहून पुढे आल्यात व त्यांनी हा आगळा वेगळा संकल्प करुन एक आदर्श निर्माण केला आहे. कारखेडा येथे स्वच्छ भारत मिशनच्या अधिकाºयांनी भेटी दिल्यात, नागरिकांना स्वच्छतेचे महत्व कळविले तरीही हगणदारी पाहिजे त्या प्रमाणात कमी होत नसल्याने महिलांची सभा घेतली. यावेळी बचत गटातील महिलाही सहभागी होत्या. अधिकाºयांनी केलेल्या मागदर्शनामुळे बचत गटातील महिलांनी पुढाकार घेवून सदर संकल्प घेतला व निर्धार व्यक्त केला. 

यावेळी मिनी गटविकास अधिकारी एम.एल. वाघमारे, विस्तार अधिकारी बेलखेडकर, सरपंच भानु जाधव, कार्लीचे सरपंच दत्ता तायडे, ग्रामसेवक एकनाथ चिकटे, कार्लीचे ग्रामसेवक आडे, तळप बु. ग्रामसेवक सोनटक्के, माविम सहयोगीनी माधुरी कांबळे, पोलीस पाटील वासुदेव सोनोने या महिलांचे कौतूक केले. यावेळी वीसही महिला बचत गटाच्या अध्यक्षा, सचिव तथा सदस्यांची उपस्थिती लाभली होती.