शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यानंतर मिळाले शालेय गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 16:13 IST

आसेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक उर्दू केंद्र शाळेत ३ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (वाशिम) : शासनाचा मोफत शालेय गणवेश योजनेंतर्गत दोन महिन्यांनी आसेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक उर्दू केंद्र शाळेत ३ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. मोफत गणवेश योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश वितरणाची मागणी सतत करण्यात येत होती. शासनाच्या मोफत शालेय गणवेश वितरण योजनेत यंदा बदल करून विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्याचे निश्चित करण्यात आले होते. या योजनेंतर्गत मंजूर झालेला निधी मुख्याध्यापकांच्या खात्यात वळता करून शाळा समितीच्या मार्फत विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यात येणार होते; परंतु शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर अनेक दिवस उलटूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नव्हते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून सतत गणवेश वितरणाची मागणी सुरू होती. अखेर ३ सप्टेंबर रोजी मंगरूळपीर पंचायत समिती अंतर्गत येणाºया आसेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक उर्दू केंद्र शाळेत वर्ग १ ली ते ७ वीपर्यंतच्या दारिद्र्य रेषेखालील १३९ विद्यार्थीनी आणि ४१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशाचे वितरण करण्यात आले. केंद्र प्रमुख आर. एच. खंडारे यांच्या मार्गदर्शनात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख हारून कुरैशी, उपाध्यक्ष एजाज खान, सदस्य जमिल कुरैशी, शेख सलीम, अध्यापक साजिद खान परवेज, काजी सलीम, जावेद अख्तर, मोहम्मद मुदस्सीर, जुबैर अहमद खान पटेल, शिक्षिका फरजाना परवीन खलिल खान, तसेच परवीन बानो यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक मोहम्मद जावेद शेख मुसा यांच्या हस्ते गणवेश वितरित करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा