शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची पूर्वतयारी; विद्यार्थ्यांना मिळाला गणवेश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 16:08 IST

Washim News विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दिला असून, शाळा सुरू करण्याची पूर्वतयारी केली जात आहे.

वाशिम : समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या पात्र ६३ हजार १७० विद्यार्थ्यांना प्रत्येकी एका शालेय गणवेशासाठी शिक्षण विभागाने शालेय व्यवस्थापन समितीकडे एका महिन्यापूर्वी निधी सुपूर्द केला. या निधीमधून विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दिला असून, शाळा सुरू करण्याची पूर्वतयारी केली जात आहे.विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे, मागासवर्गीय व गोरगरीब विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून समग्र शिक्षा अभियानातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेश दिले जातात. कोरोनामुळे यंदा राज्यासमोर आर्थिक संकट असल्याने पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी एका गणवेशासाठी ३०० रुपये याप्रमाणे एका महिन्यापूर्वी शासनाकडून जिल्ह्याला एक कोटी ७० लाख ७० हजार रुपयांचा निधी मिळाला. जिल्हास्तर व पंचायत समिती स्तरावरून शाळा व्यवस्थापन समितीकडे हा निधी वितरीत करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समितीने गणवेशाची खरेदी केली असून, बहुतांश पात्र विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश पुरविला आहे. दुसºया टप्प्यातील निधीची प्रतिक्षापहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेला १.७० कोटींचा निधी मिळाला आहे. दुसरा गणवेश घेण्यासाठी दुसºया टप्प्यातील निधी अद्याप जिल्हा परिषद प्रशासनाला मिळाला नाही. दुसºया टप्प्यातील निधी केव्हा मिळणार? याबाबत तुर्तास तरी काही निश्चितता नाही.  समग्र शिक्षा अभियानातून पात्र विद्यार्थ्यांना प्रती दोन गणवेश दिले जातात. यंदा एका गणवेशासाठी शिक्षण विभागाला १.७० कोटींचा निधी प्राप्त झाला. हा निधी गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत शालेय व्यवस्थापन समितीला दिला आहे. शालेय व्यवस्थापन समितीने गणवेश खरेदी केली असून, पात्र विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश पुरविण्यात आले. पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याची तयारी केली जात आहे.- अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थी