शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकांची गुढी उभारून अभिनव पद्धतीने ‘प्रवेशोत्सव’, कामरगाव जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 20:53 IST

आनंद, उत्साह आणि यश साजरे करण्यासाठी गुढी उभारल्या जाते. परंतु कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयांमध्ये २६ जूनला  चक्क पुस्तकांची गुढी उभारुन प्रवेशोत्सव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 कारंजा - आनंद, उत्साह आणि यश साजरे करण्यासाठी गुढी उभारल्या जाते. परंतु कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयांमध्ये २६ जूनला  चक्क पुस्तकांची गुढी उभारुन प्रवेशोत्सव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प सदस्य मिना भोने तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य रवि भूते, शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा देशमुख, पालक प्रतिनिधी संजय राऊत व लक्ष्मणराव लाकडे उपस्थित होते. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल. यावेळी पुस्तकांची गुढी उभारून प्रवेशोत्सव दिन साजरा केला.या गुढीवर ‘सारे शिकूया, पुढे जाऊया, गणित, वजाबाकी, बेरीज चिन्हे विविध शब्द या गुढीवर लावले होते. ही गुढी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये फिरवली. ही गुढी शिक्षक गोपाल खाडे यांनी तयार केली होती. यावेळी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. जि.प.सदस्य भोने यांच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन निता तोडकर यांनी तर आभार वसंत चव्हान यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :newsबातम्याSchoolशाळा