शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शालेय साहित्य महागले; पालकांच्या खिशाला झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 18:03 IST

वाशिम : २६ जूनपासून शाळा सुरू होत असून, विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत पालकांची एकच गर्दी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : २६ जूनपासून शाळा सुरू होत असून, विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत पालकांची एकच गर्दी होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पुस्तके, वह्या, गणवेश व अन्य साहित्याच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.विदर्भातील शाळांची पहिली घंटा २६ जून रोजी वाजणार आहे. दोन दिवसाने शाळा सुरू होणार असल्याने विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य  खरेदी करण्यासाठी रविवारी बाजारपेठेत एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. गतवर्षी पेक्षा यंदा शैक्षणिक साहित्य महागले असून सात ते दहा टक्क्यांदरम्यान दरवाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे अगोदरच त्रस्त झालेल्या पालकांच्या खिशाला दरवाढीमुळे कात्री लागली आहे. सामान्यत: कच्चा माल, पेट्रोल व डिझेल यांचे भाव वाढल्यामुळे यावर्षी शैक्षणिक साहित्यही महागले असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. दप्तर व वह्यांचे दर वाढल्याचे दिसून येते. सरासरी १० टक्क्याने वाढ झाल्याने सर्वसामान्य पालकांचे बजेटही कोलमडत आहे. दप्तर व वह्यांचे दर वाढले आहेत. दोनशे पानी वह्या १४० ते ३२० रुपये डझन, ए फोर साईज वह्या २५० ते ६०० रुपये डझन, शंभर पानी वह्या १४० ते १६० रुपये डझन, दोनशे पेजेस लहान वह्या २८० ते ३०० रुपये तर मोठ्या वह्या ५६० ते ६०० रुपये डझन या दरम्यान किंमती आहेत. कापडावर जीएसटी लागू असल्याने दप्तराच्या किंमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे. बाजारात दप्तरांची किंमत २०० रुपयापासून ते १२०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र