शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

स्कूलबस चालकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 12:35 IST

School Bus News शाळा बंदमुळे स्कूलबसचा व्यवसाय अद्यापही सुरू होऊ शकला नाही.

ठळक मुद्देर्सरी ते आठवीचे वर्ग अद्यापही सुरू झाले नाहीत. त्यामुळे स्कूल बसची चाकेही जागेवरच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदा कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला; परंतु अनलाॅकच्या टप्प्यात अन्य उद्योगधंदे पूर्ववत होत असताना, शाळा बंदमुळे स्कूलबसचा व्यवसाय अद्यापही सुरू होऊ शकला नाही. परिणामी, चालक व मालकांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला असून, वाहन उभे असतानाही विविध प्रकारचा कर भरण्याची वेळ आली आहे.यंदा मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लाॅकडाऊन आहे. जून महिन्यापासून अनलाॅकचे टप्पे सुरू झाले. त्यामुळे टप्प्याटप्प्याने बहुतांश उद्योग, धंदे सुरू झाले आहेत. दुसरीकडे नर्सरी ते आठवीचे वर्ग अद्यापही सुरू झाले नाहीत. त्यामुळे स्कूल बसची चाकेही जागेवरच आहेत. याचा सर्वाधिक फटका चालकांना बसला आहे. कोरोनामुळे खासगी वाहनांवरदेखील चालकाचा रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा? असा पेच चालकांसमोर निर्माण झाला आहे. स्कूल बसमधून खासगी प्रवासी वाहतूकदेखील करता येत नसल्याने स्कूलबसच्या मालकांसमोरही आर्थिक प्रश्न निर्माण झाला. 

उपजिविकेसाठी पर्यायी व्यवसायकोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लाॅकडाऊन आहे. अनलाॅकच्या टप्प्यात अनेक उद्योगधंदे पूर्ववत झाले. शाळा सुरू नसल्यामुळे स्कूल बसेस बंद असल्याने स्कूल बस चालक व मालकांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला. काहींनी पर्यायी व्यवसाय सुरू केला तर काही जणांना घरी बसण्याशिवाय पर्याय नाही. काही चालकांनी अन्य वाहनावर चालक म्हणून रोजगार शोधला आहे. काही स्कूल व्हॅन, आॅटोवाल्यांनी शहरात खासगी प्रवासी वाहतूक करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, यामध्ये फारसे यश नाही.

कोरोना विषाणू संसर्गाचा फटका सर्वच उद्योगधंद्यांना बसला आहे. अनलॉकच्या टप्प्यात बहुतांश उद्योग, धंदे पूर्ववत झाले. परंतु शाळा सुरू झाल्या नसल्यामुळे स्कूल बस जागेवरच उभ्या आहेत. यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यायी रोजगारदेखील उपलब्ध नाही. स्कूलबस जागेवरच उभ्या असल्याने शासनाने वाहनाचा विविध प्रकारच्या कर माफ करणे अपेक्षित आहे.- आशिष देशमुखस्कूल बस मालक वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा