मानोरा पोलीस स्टेशनमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत परदेशी, तहसीलदार संदेश किर्दक, नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गायकवाड, पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांची उपस्थिती होती. कोविड १९ची दुसरी लाट जरी जिल्ह्यात ओसरली असली तरीसुद्धा धोका अद्याप टळलेला नाही, त्या अनुषंगाने नागरिकांनी आगामी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा न करता अतिशय साधेपणाने साजरा करा, कोविड-१९ च्या लसीकरणाबाबत मानोरा तालुक्याची टक्केवारी अतिशय कमी आहे, यासाठी गणेश उत्सव मंडळांनी जनजागृती करून मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घ्यावे. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील जाधव, डॉ.संजय रोठे, राजू गुल्हाने, प्रवीण ठाकरे, मास्टर अनिस उद्दिन यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुचेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सोनावणे, पोलीसपाटील जिल्हा अध्यक्ष श्यामराव राठोड, गोविंद हेडा, आशिष चौधरी, नगराध्यक्षा बरखा बेग, शिवसेनेचे राजू देशमुख, किरण पदमगिरवार, निसार शहा, राजेश चव्हाण, गजानन सोळंके यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पोलीसपाटील वासुदेव सोनोने, तर आभार प्रमोद सोनवणे यांनी मानले.
सण-उत्सवापेक्षा जीव वाचवणे महत्त्वाचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST