शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शाळा वाचवा, शिक्षण वाचवा! शाळांच्या कंत्राटीकरणास विरोध, आंदोलनासाठी विद्यार्थीही सरसावले

By संतोष वानखडे | Updated: September 25, 2023 19:10 IST

शाळा वाचविण्याच्या आंदोलनाची पूर्वतयारी व जनजागृती म्हणून सोमवारी (दि.२५) विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे ग्रामीण भागात दिसून आले.

वाशिम : राज्यातील सर्व सरकारी शाळांच्या कंत्राटीकरणाचा तसेच सरकारी नोकरभरती खाजगी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी सामाजिक संघटनांसह विद्यार्थीदेखील सरसावले आहेत. शाळा वाचविण्याच्या आंदोलनाची पूर्वतयारी व जनजागृती म्हणून सोमवारी (दि.२५) विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे ग्रामीण भागात दिसून आले.

सरकारी शाळा कंत्राटी पद्धतीने उद्योगपतींना चालविण्यास देणार असल्याचा शासन निर्णय नुकताच शासनाने काढला आहे. तसेच सरकारी नोकर भरती ही खाजगी संस्थांच्या  माध्यमातून करण्याबाबतचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे. हे दोन्हीही निर्णय पुरोगामी महाराष्ट्राला खाईत लोटणारे आहेत, असा आरोप समनक जनता पार्टी व शाळा बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केला. उपरोक्त निर्णय हे शिक्षण हक्क कायद्याला पायदळी तुडविणारे असून, आरक्षण संपविणारे आहेत. त्यामुळे हे निर्णय तात्काळ रद्द करावेत आणि पूर्वीप्रमाणेच सरकारी नोकरभरती करावी, शिक्षणाचे राष्ट्रीयिकरण करावे तसेच यूपीएससी परीक्षा न घेता हुकूमशाही पद्धतीने केलेल्या आयएएस दर्जाच्या नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात, अशी मागणीही शाळा बचाव समितीसह सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनी केली.

.. तर गरीबाच्या मुलांनी शिकावे कसे?वस्ती, पाड्यावरील तसेच गावातील २० पटसंख्येच्या खालील शाळा बंद झाल्या तर गोरगरीबांच्या मुलांनी शिकावे कसे? असा प्रश्नही शाळा बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. सरकारी शाळा वाचविण्याच्या या चळवळीत चिमुकलेदेखील सहभागी होत असल्याचे सोमवारी (दि.२५) दिसून आले.

आज रास्ता रोको आंदोलनाची हाकसरकारी शाळांच्या कंत्राटीकरणाचा तसेच सरकारी नोकरभरती खाजगी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी वाशिम येथील वसंतराव नाईक चौक येथे शाळा बचाव समिती, समनक जनता पार्टी व शिक्षणप्रेमींच्यावतीने रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाTeacherशिक्षक