शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जासाठी बँकेतच मिळणार सातबारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 12:31 IST

Washim News वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनादेखील पीककर्जासाठी बँकेतच ऑनलाईन पद्धतीने सातबारा उपलब्ध होणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पीककर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता राष्ट्रीयकृत बँकेतच सातबारा मिळणार असल्याने सेतु केंद्र किंवा तलाठी कार्यालयाकडे जाण्याची गरज नाही. जमाबंदी आयुक्त विभागाकडून राज्यातील २३ बँकांशी सामंजस्य करार झाल्याने वाशिम जिल्ह्यातही ही सुविधा उपलब्ध झाली आहे.कोणत्याही प्रकारचे कर्ज काढण्यासाठी शेतकरी किंवा जमीनधारकांना सातबारा सादर करणे बंधनकारक आहे. सातबाऱ्याला ऑनलाइनची जोड देण्यात आली असून, तलाठी, आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतु केंद्रातून संगणकीकृत सातबारा दिला जातो. पीककर्ज काढण्यासाठी शेतकºयांना सातबारा सादर करावा लागत असल्याने यासाठी तलाठी कार्यालय किंवा सेतु केंद्राचे उंबरठे झिजवावे लागत होते. अनेकवेळा कनेक्टिव्हिटी नसल्याने सातबारा मिळण्यास विलंब होत होता. शेतकºयांची ही गैरसोय टाळण्यासाठी जमाबंदी आयुक्त कार्यालयाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने बँकिंग पोर्टल विकसित करण्यात आले. याद्वारे राज्यातील कोणत्याही गावचे सातबारा, खाते उतारे व ऑनलाईनला नोंदविलेले डिजिटल स्वाक्षरीतील उतारे, फेरफार बँक किंवा वित्तीय संस्थांना प्रत्येकी १५ रुपये नक्कल शुल्क भरून ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलची सेवा मिळण्यासाठी आतापर्यंत २३ बँकांनी सामंजस्य करार केला आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनादेखील पीककर्जासाठी बँकेतच ऑनलाईन पद्धतीने सातबारा उपलब्ध होणार आहे, याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांनी केले. 

पीककर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेतच संगणकीकृत व डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा मिळणार आहे. त्यामुळे शेतकºयांना सेतू केंद्र किंवा अन्य ठिकाणी जाण्याची गरज नाही. ही सुविधा वाशिम जिल्ह्यातही सुरू झाली आहे.- दत्तात्रय निनावकरव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक वाशिम.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज