लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: यंदा अपुर्या पावसामुळे जलाशयात ठणठणाट आहे. ओढे, तलाव, नाले कोरडेच असल्याने शेतकर्यांचा खरा आधार असलेल्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आतूर असलेल्या शेतकर्यांना यंदा त्याच्या सच्चा साथीदाराची खांदेमळण घरीच पाणी आणून करावी लागल्याचे चित्र परिसरात दिसले. शेतकर्यांसाठी सर्वात महत्त्वाचा सण असलेला पोळा. बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैलांना ओढे, नाल्यावर नेऊन त्या ठिकाणी न्हाऊ घालत त्याची खांदेमळण करतो. हे करताना शेतकर्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. शेतीसाठी बैलांचा वापर करण्यास सुरुवात झाली, अगदी तेव्हापासून ही परंपरा कायम आहे. अलीकडच्या काळात शेतीसाठी बैलांचा वापर कमी झाला असला, तरी शेतकर्यांसाठी पोळा सणाचे महत्त्व आजही पूर्वीएवढेच कायम आहे. त्यामुळे यंदाही शेतकर्यांनी सोमवारी साजरा करण्यात येत असलेल्या पोळा सणाची तयारी केली आहे; परंतु यंदा अपुर्या पावसामुळे जलसाठे कोरडे असल्याने शेतकर्यांना बैलास निसर्गरम्य वातावरणात नेऊन न्हाऊ घालता आले नाही. तथापि, शेतकर्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यात कोणतीच कसर सोडली नाही. विहिरीचे पाणी भरून अनेक शेतकर्यांनी बैलांना घरी किंवा शेतात न्हाऊ घालून त्यांची खांदेमळण केली.
सर्जा-राजाची खांदेमळण घरीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:12 IST
इंझोरी: यंदा अपुर्या पावसामुळे जलाशयात ठणठणाट आहे. ओढे, तलाव, नाले कोरडेच असल्याने शेतकर्यांचा खरा आधार असलेल्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आतूर असलेल्या शेतकर्यांना यंदा त्याच्या सच्चा साथीदाराची खांदेमळण घरीच पाणी आणून करावी लागल्याचे चित्र परिसरात दिसले.
सर्जा-राजाची खांदेमळण घरीच!
ठळक मुद्देप्रकल्पांमध्ये अल्प जलसाठा शेतकर्यांचा उत्साह कायम