शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर झालेले टँकर गावात पोहचलेच नाहीत! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 14:51 IST

६ गावांत टँकर मंजुरही झाले; परंतु आता २० दिवस उलटले तरी, या ६ पैकी खैरखेडा वगळता एकाही टँकर गावात पोहचलेच नाही. 

- अरूण बळी मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील अनेक गावात गेल्या तीन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई असून, ग्रामस्थांना पाणासाठी भटकंती करावी लागत आहे. या समस्येवर नियंत्रणासाठी ग्रामपंचायतींनी टँकरने पाणी पुरवठ्याची मागणी केली. त्यानंतर ६ गावांत टँकर मंजुरही झाले; परंतु आता २० दिवस उलटले तरी, या ६ पैकी खैरखेडा वगळता एकाही टँकर गावात पोहचलेच नाही. मालेगाव तालुक्यात ११४ गावे आहेत. त्यापैकी २८ गावात तीव्र पाणीटंचाई आहे. गावातील ग्रामस्थांना पाणी मिळावे म्हणून ३० ग्रामपंचायतीनी विहिरी कूपनलिका अधिग्रहणाचे तर ८ ग्रामपंचायतीने टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी विहिरी कूपनलिकाचे २६ तर ६ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव उपविभागीय स्तरावरून जिल्हाधिकारी कार्यालयाले पाठविण्यात आले होते. त्यापैकी विहिरी, कूपननलिकेचे ११ प्रस्ताव चर ६ टँकरचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यात राजुरा, वरदरी, देवठाणा खांब, खैरखेडा आणि पिंपळवाडीसह इतर गावांत टँकर मंजूर झाले होते. त्यामुळे टँकर गावात पोहचून ग्रामस्थाना पाणी मिळेल अशी आशा वाटू लागली होती; परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळ मंजूर झालेल्या ६ टँकर पैैकी खैरखेडा वगळता अद्याप एकाही गावात टँकर पोहचलेच नाही. त्यामुळे रखरखत्या उन्हात ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. घडाभर पाण्यासाठी मैलभर भटकणाºया ग्रामस्थांकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष संतापजनक असून, मंजूर झालेले टँकर पावसाळ्यात गावात पोहोचणार काय, असा  प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात तीन महिन्यांपासून पाण्यासाठी भटकत असणाºया ग्रामस्थांसाठी सुविधा म्हणून २० दिवसांपूर्वी टँकर मंजूर करण्यात आले खरे; परंतु अद्यापही ६ पैकी पाच गावांत टँकरच पोहोचले नाही. त्यामुळे कागदोपत्री उपाय योजना दाखवून ग्रामस्थांची हेटाळणी करण्याचा प्रकार प्रशासनाकडून होत असल्याचे दिसत आहे. प्रशासनाच्या या कृतीबाबत पाणीटंचाईचा सामना करणाºया गावांत प्रचंड रोषाचे वातावरण निर्माण झाले असून, आता गावात टँकरची प्रतिक्षा करणारे ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. 

टँकर मंजूर झालेल्या गावांत येत्या दोन दिवसात टँकर पोहचले नाही, तर मालेगाव तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांसह उपोषणाला सुरुवात करू.-अन्नपूर्णा दिलीप भुरकांडे -पं. स. सदस्या

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई