शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यातील ‘त्या’ मृतक रुग्णाच्या वाशिम येथील नातेवाईकाचे नमुने तपासणीला पाठविले नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 17:42 IST

‘थ्रॉट स्वॅब’ नमुने तपासणीसाठी अद्याप पाठविले नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी मंगळवारी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला. या रुग्णाला आजारी असताना काही दिवसापूर्वी वाशिम येथील त्याचा नातेवाईक भेटण्यासाठी गेल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून वाशिम येथील नातेवाईक इसमाला ३० मार्च रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील विलगीकरण (क्वारंटाईन) कक्षात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवले आहे; परंतु कोरोना विषाणू संदर्भातील कोणतीही लक्षणे त्याच्यात आढळून आली नसल्याने त्याच ‘थ्रॉट स्वॅब’ नमुने तपासणीसाठी अद्याप पाठविले नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी मंगळवारी दिली. वाशिम जिल्ह्यात अद्यापपर्यंत ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. तथापि, बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला. या रुग्णाला आजारी असताना तीन-चार दिवसापूर्वी वाशिम येथील काही नातेवाईक भेटण्यासाठी गेले होते. तसेच सदर रुग्णाच्या अंत्यविधीला सुध्दा काही नातेवाईक उपस्थित असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे खबरदारी म्हणून वाशिम येथील बागवान पुºयातील एका नातेवाईकाला जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण (क्वारंटाईन) कक्षात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. दरम्यान, सोमवारी माहिती घेतली असता सदर इसम कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्यसंस्कारात सहभागीच झाला नसल्याचे सदर इसमाने सांगितल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी सोमवारी दिली, तसेच त्या इसमात कोरोना विषाणूच्या संसर्गाची कोणतीच लक्षणे अद्याप आढळली नसल्याने त्याच्या ‘थ्रॉटचे स्वॅब’ नमुने तपासणीसाठी पाठविले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbuldhanaबुलडाणा