शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Sameer Wankhede : व्हॉट्सअप स्टेट्सला फोटो, गावच्या पोलीस पाटलांनाही समीर वानखेडेंचा अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 21:00 IST

गावात आले की ते प्रत्येकाला भेटतात, समीरसुद्धा माझ्या घरी आला होता. आपल्या गावकडच्या सर्व मुलांनी समीर वानखेडेंचे फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलेत.

ठळक मुद्देसमीर वानखेडे यांचे मूळगाव असलेले वरूड तोफा हे वाशिम-रिसोडवरील आसेगावपासून ५ किमी अंतरावर आहे. याठिकाणी समीर वानखेडे यांची वडीलोपार्जीत शेती व घर असून येथे त्यांचे चुलत भावंड राहतात.

वाशिम - ड्रग्स माफियांवर धडाकेबाज कारवाई करून मंत्र्यांसह अभिनेत्यांना घाम फोडणारे एनसीबीचे (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो/अंमली पदार्थ नियंत्रण कक्ष) विभागीय संचालक समीर वानखेडे हे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वरूड तोफा या गावचे मूळ रहिवासी आहेत. त्यामुळेच, येथील गावकऱ्यांन आपल्या भूमीपुत्राचा अभिमान वाटत असून गावातील युवकांनी व्हॉट्सअपला स्टेटस म्हणून समीर यांचे गावातील फोटो ठेवले आहेत. गावच्या पोलीस पाटील यांनीही समीरसोबतच्या आठवणी जागवल्या आहेत. सध्या, वाशिम जिल्ह्यास वरुड तोफा गाव चांगलंच चर्चेत आहे. (People of the Washim district pride to Sameer Wankhede.)

गावात आले की ते प्रत्येकाला भेटतात, समीरसुद्धा माझ्या घरी आला होता. आपल्या गावकडच्या सर्व मुलांनी समीर वानखेडेंचे फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलेत. कालपासून आपल्या पीएसआयचेसुद्धा फोन येऊन राहिलेत, समीर वानखेडे नेमका कुठलाय? हीच विचारणा करतायंत, असे गावच्या पोलीस पाटलांनी सांगितलं. समीरचं घर गावात आहे, शेती आहे, त्यांचं शिक्षणही इथच झालंय. आता, ते मुंबईत स्थायिक झाले आहेत. पण, गावाकडं आलं की सगळ्यांना भेटून जातात, लहान मुलांसाठी खाऊ आणतात, चॉकलेट आणतात, अशी आठवणही पोलीस पाटलांनी सांगितली.

समीर वानखेडे यांचे मूळगाव असलेले वरूड तोफा हे वाशिम-रिसोडवरील आसेगावपासून ५ किमी अंतरावर आहे. याठिकाणी समीर वानखेडे यांची वडीलोपार्जीत शेती व घर असून येथे त्यांचे चुलत भावंड राहतात. त्यांचे वडील मुंबई येथे पोलीस विभागात अधिकारी म्हणून नोकरीवर असताना, ते मुंबईतच स्थाईक झाले. समीर यांचे संपूर्ण शालेय शिक्षण तेथेच झाले असून, आजही सणावाराला आणि लग्नाकार्याला ते गावी येतात. त्यावेळी, गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन, गप्पागोष्टी करत असतात. 

समीर वानखेडे 2008 च्या बॅचचे अधिकारी

समीर हे आयआरएसच्या २००८ च्या बॅचचे अधिकारी आहेत. समीर वानखेडे हे ड्रग्सशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. त्यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे १७ हजार कोटींच्या ड्रग्स रॅकेटचा पदार्फाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली. सुशांतपासून ते बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानच्या मुलापर्यंत त्यांनी कारवाया केल्या आहेत. ड्रग्स माफियांचा कर्दनकाळ आणि मंत्री नबाब मलिक यांनाही घाम फोडणारे समीर वानखेडे मूळ वाशिमकर असल्याचे समजताच जिल्हावासियांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

विविध पदांवर बजावले कर्तव्य - २००८ ते २०२१ पर्यंत त्यांनी एअर इंटेलिजन्स युनिटचे (एआययू) उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संयुक्त आयुक्त आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक, अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

गावाशी ऋणानुबंध कायम! -समीर वानखेडे यांचे बालपण मुंबईत गेले असले तरी गावाशी असलेला ऋणानुबंध त्यांनी कायम ठेवला आहे. नोकरीत असतानाही ते दीड, दोन वर्षातून एकदा आपल्या गावी वरूड तोफा येथे आवर्जून येतात. याशिवाय कुटुंब तसेच भावकितील महत्वाच्या कार्यातही ते हजेरी लावतात.

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेwashimवाशिमPoliceपोलिसnawab malikनवाब मलिक