शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक संवर्गातील जि. प. कर्मचाऱ्यांची ७ व्या आयोगाची वेतन निश्चिती प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 14:40 IST

अद्याप पश्चिम वºहाडातील शिक्षक संवर्गातील जि. प़ कर्मचाºयांची वेतन निश्चितीच होऊ शकली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी २०१९ पासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन अदा करण्याबाबत ग्रामविकास विभागाने निर्देशित केले आहे. यासाठी मार्च २०१९ या महिन्याचे सातव्या आयोगानुसार वेतन निश्चित करून जानेवारी २०१९ ते मार्च २०१९ या तीन महिन्याच्या थकबाकीसह अनुदानाची मागणी नोंदविण्याच्या सुचनाही देण्यात आल्या; परंतु अद्याप पश्चिम वºहाडातील शिक्षक संवर्गातील जि. प़ कर्मचाºयांची वेतन निश्चितीच होऊ शकली नाही.शिक्षक संवर्गातील जि.प. कर्मचाºयांची ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्याची कार्यवाही करून त्यांना जानेवारी २०१९ देय फेब्रुवारी २०१९ या महिन्याच्या वेतनापासून रोखीने लाभ देण्याच्या सुचना ग्रामविकास विभागाने २० फेब्रुवारी २०१९ च्या निर्णयाद्वारे दिल्या होत्या. ही वेतननिश्चितीची ही कार्यवाही माहे मार्च २०१९च्या वेतनापासून रोखीने वेतन देण्याबाबत करण्याचेही शासन निर्णयात नमूद आहे. जिल्हा परिषद स्तरावर शिक्षणाधिकाºयांनी या निर्णयाची दखल घेत सर्व पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाºयांना पत्र पाठवित शासन निर्णयानुसार वेतननिश्चितीची कार्यवाही करण्यासह जानेवारी २०१९ ते मार्च २०१९ या महिन्यापर्यंतच्या थकबाकीसह अनुदानाची मागणी नोंदविण्याच्या सुचनाही दिल्या होत्या. वाशिम जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षणाधिकाºयांनी यासाठी २५ एप्रिल २०१९ पर्यंतची मुदत इेताना यास विलंब होणार नसल्याची दक्षता घेण्याच्या सुचना गटशिक्षणाधिकाºयांना केल्या होत्या. आता शासन निर्णयानुसार ७ व्या वेतना आयोगानुसार वेतन निश्चिती करून एप्रिल २०१९ पासून त्याचा लाभ शिक्षक संवर्गातील कर्मचाºयांना मिळणे अपेक्षीत असताना एप्रिल महिना संपला तरी, ७ व्या वेतन आयोगानुसार शिक्षक संवर्गातील कर्मचाºयांची वेतननिश्चितीच झालेली नाही. हजारो शिक्षक संभ्रमात पडले आहेत. मार्च महिन्याच्या वेतनाचा खोळंबाशिक्षक संवर्गातील जि.प. कर्मचाºयांची ७ व्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती झाली नाही. त्यात मार्च महिन्याच्या वेतनासाठी निधीही नसल्याने शिक्षकांचे वेतन खोळंबले आहे. दरम्यान, शिक्षकांना ७ व्या वेतन आयोगानुसार लाभ देण्यासाठी त्याच आधारे निधीची मागणी पंचायत समितीस्तरावरून करण्यात आली आहे. त्यामुळे या महिन्यात शिक्षकांना ७ व्या वेतन आयोगाचा लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून, शिक्षकांना शासन निर्णयानुसार एप्रिल महिन्याच्या वेतनापासूनच लाभ देण्यात येईल. याबाबत सर्व गटशिक्षणाधिकाºयांना सुचित करण्यात आले आहे.- अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक)जि.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदTeacherशिक्षक