शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई : अमरावती विभागात १२ दिवसात केवळ २१२ शाळांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 15:25 IST

शाळा नोंदणीसाठी उरले केवळ चार दिवस !

- संतोष वानखडेवाशिम : आरटीई अंतर्गत (राईट टु एज्युकेशन) पात्र बालकांना इयत्ता पहिल्या वर्गात मोफत प्रवेश देण्यासाठी ११ फेब्रुवारीपासून आॅनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तत्पूर्वी खासगी शाळांना २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या दरम्यान नोंदणी करावी लागणार आहे. अमरावती विभागात २ फेब्रुवारीपर्यंत केवळ २१२ शाळांची नोंदणी झाली आहे.शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन) मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा यामागील उदात्त हेतू आहे. या कायद्यान्वये खासगी नामांकित शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील मोफत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, पहिल्या टप्प्यात २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या दरम्यान शाळांनी नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर ११ ते २९ फेब्रुवारी या दरम्यान पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत. शाळांची नोंदणी प्रक्रिया २१ जानेवारीपासून सुरू झालेली असताना, १३ दिवसात अमरावती विभागातील केवळ २१२ शाळांनी नोंदणी केली आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील तीन, बुलडाणा ११७, अमरावती १७, यवतमाळ ५५ आणि वाशिम जिल्ह्यातील २० शाळांचा समावेश आहे. शाळांची नोंदणी प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.  आरटीई अंतर्गत खासगी शाळांना ६ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. वाशिम जिल्ह्यातील शाळांनी विहित मुदतीच्या आत नोंदणी करावी, अशा सूचना दिलेल्या आहेत. विहित मुदतीपर्यंत बºयापैकी शाळांची नोंदणी होईल.- अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदाSchoolशाळा