लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत प्रतीक्षा यादीतील बालकांना मोफत प्रवेश घेण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून, २९ ऑक्टोबरपर्यंत संबंधित शाळेत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले.आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिल्या वर्गात एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे मोफत प्रवेश प्रक्रियादेखील प्रभावित झाली. पहिल्या लॉटरीमध्ये जिल्ह्यातील ९७६ बालकांची निवड झाली. या बालकांना प्रवेश घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत चार वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर ३० सप्टेंबरपासून प्रतीक्षा यादीतील बालकांना मोफत प्रवेशाची संधी देण्यात आली. पहिल्यांदा ८ आॅक्टोबरपर्यंत, दुसºयांदा २३ आॅक्टोबरपर्यंत आणि आता तिसºयांदा २९ आॅक्टोबरपर्यंत या बालकांना मोफत प्रवेशासाठी कागदपत्रे ही संबंधित शाळेत दाखल करण्याची अंतिम मुदत मिळालेली आहे. जिल्ह्यातील ९७६ पैकी आतापर्यंत ६०७ बालकांनी प्रवेश घेतले आहेत. उर्वरीत ३६९ बालकांनी अद्याप कागदपत्रे सादर केली नसल्याने त्यांचे प्रवेश होऊ शकले नाहीत. २९ आॅक्टोबर ही अंतिम मुदत असल्याने मुदतीच्या आत विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संबंधित शाळेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी केले.
आरटीई : मोफत प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 17:09 IST
Right Education Act, Washim News २९ ऑक्टोबरपर्यंत संबंधित शाळेत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले.
आरटीई : मोफत प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ
ठळक मुद्देगुरूवारपर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन३६९ बालकांचे कागदपत्रे अप्राप्त