शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई: अंतिम मुदतीनंतरही मोफत प्रवेशाच्या जागा रिक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 15:16 IST

मुदत संपल्यानंतरही मोफत प्रवेशाच्या जवळपास २५० जागा रिक्त राहिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत तिसºया लॉटरी पद्धतीत निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी २४ जुलै अशी अंतिम मुदत होती. ही मुदत संपल्यानंतरही मोफत प्रवेशाच्या जवळपास २५० जागा रिक्त राहिल्या आहेत. एकूण ९६५ पैकी ६९० बालकांचे प्रवेश झाले आहेत. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागास प्रवर्ग, दिव्यांग व वंचित घटकांतर्गत येणाºया बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यातील ९३ नोंदणीकृत खासगी शाळांमध्ये राबविली जात आहे. या शाळांतील एकूण ९६५ जागांसाठी अंतिम मुदतीपर्यंत १८८२ प्रवेश अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या लॉटरी पद्धतीत ५४३ बालकांची आणि दुसºया लॉटरी पद्धतीतून ३८८ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली होती. विहित मुदतीत पालकांनी पडताळणीसाठी कागदपत्रे सादर न केल्याने प्रवेशपात्र ९३१ पैकी ३७८ बालकांचे प्रवेश झाले नव्हते तर  उर्वरीत ५५३ बालकांनी प्रवेश घेतले. रिक्त जागांवर प्रवेश व्हावे यासाठी १० जुलै रोजी काढलेल्या तिसºया लॉटरी सोडतीत २७० बालकांची निवड झाली. ११ जुलै ते १६ जुलैपर्यंत या बालकांनी संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेण्याची मुदत देण्यात आली होती. या मुदतीपर्यंत अनेक बालकांना प्रवेश घेता न आल्याने मुदतवाढ देण्याची मागणी पुढे आली होती. त्यानुसार २४ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या कालावधीत १३७ बालकांनी प्रवेश घेतले तर उर्वरीत १३३ बालकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालय किंवा संबंधित शाळेशी संपर्क साधला नाही. त्यामुळे ही बालके मोफत प्रवेशापासून वंचित राहण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिन्ही लॉटरी पद्धतीतून जवळपास ६९० बालकांनी प्रवेश घेतले  आहेत. एकूण ९६५ जागा असल्याने ६९० जागेवर प्रवेश झाले असून, उर्वरीत २७५ जागा रिक्त राहणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.  शिक्षणाधिकाºयांना घ्यावा लागणार आढावामोफत प्रवेश प्रक्रियेला २४ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. २४ जुलैपर्यंत पात्र बालकांनी प्रवेश घेणे बंधनकारक होते. अंतिम मुदतीपर्यंत जवळपास १३३ बालकांनी शिक्षण विभाग किंवा संबंधित शाळेशी संपर्क साधला नाही. त्यामुळे या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, रिक्त जागांसंदर्भात शिक्षणाधिकाºयांनी (प्राथमिक) २५ व २६ जुलै रोजी आढावा घेऊन त्याची निश्चिती करावी, अशा सूचना वरिष्ठस्तरावरून प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार या दोन दिवसात रिक्त जागांचा आढावा घेऊन वरिष्ठांकडे अहवाल पाठविला जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदाEducationशिक्षण