शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

तिर्थक्षेत्र विकासासाठी वाशिम जिल्ह्याला ३ कोटींचा निधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 14:23 IST

वाशिम : जिल्ह्यातील विविध तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी ग्रामविकास खात्याकडून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  वाशिम जिल्ह्यातील विविध तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी ग्रामविकास खात्याकडून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भक्तांना सोयी-सुविधा पुरविणे स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या उत्पन्नातून शक्य नसल्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्ष तथा कारंजा मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी मानोरा तालुक्यातील कोंडोली तसेच मंगरूळपीर तालुक्यातील ईचा-नागीसाठी  शासनाकडे पाठपुरावा केला होता. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कोंडोली येथील श्रीक्षेत्र पितांबर महाराज संस्थानसाठी २ कोटी तर ईचा-नागी येथील श्री.महादेव संस्थानसाठी १ कोटी ३ लक्ष रूपयांच्या विकास कामांस प्रशासकीय मंजुरी दिली आहे.ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील तिर्थक्षेत्र श्री.पितांबर महाराज संस्थान, कोंडोली येथील भक्तनिवास बांधकामासाठी २ कोटी रूपयास शासनाने मान्यता दिली आहे. याशिवाय मंगरूळपीर तालुक्यातील श्री.महादेव संस्थान, ईचा-नागी करिता भक्तनिवास बांधकामासाठी ६०.७४ लक्ष, संरक्षण भिंत बांधकामासाठी २०.२७ लक्ष, स्वच्छतागृहासाठी १३.४५ लक्ष तर पाण्याच्या टाकीसाठी ९.५३ लक्ष असा एकुण १ कोटी ३ लक्ष ९९ हजार रूपयांचा निधी मंजुर केला आहे. वरील कामांची जबाबदारी ही वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे नियंत्रणाखाली करण्याचे शासनाने सुचविले असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिली आहे.

टॅग्स :washimवाशिमPankaja Mundeपंकजा मुंडेRajendra Patniराजेंद्र पाटणी