जिल्हा रुग्णालयात पाण्याचा अभाव
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही. यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना घरून पाणी आणावे लागत आहे किंवा बाहेरून विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याचे दिसून येत आहे.
....................
‘त्या’ कामगारांचे उपोषण सुरूच
वाशिम : कामगार पुरविणाऱ्या एजन्सीने अन्यायकारक धोरण अवलंबिल्याप्रकरणी येथील विद्युत भवनासमोर बेमुदत उपोषण पुकारलेल्या कंत्राटी कामगारांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच होते.
...................
नव्या रस्त्यांच्या कडेला वृक्ष लागलेच नाही
वाशिम : वाशिम ते अनसिंग या रस्त्याचे रुंदीकरण करत असताना मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले; मात्र त्याठिकाणी नव्याने वृक्षलागवड करण्याचा संबंधित कंत्राटदाराला विसर पडला आहे. यामुळे रस्ते बोडखे दिसून येत आहेत.