शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

३१ जणांची नळजोडणी खंडीत; रिसोड नगर परिषद 'ॲक्शन मोड'वर, पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम

By संतोष वानखडे | Updated: September 6, 2022 19:15 IST

रिसोड नगर परिषदेने पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम राबवली आहे.

वाशिम: मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीत रिसोड नगर परिषद माघारल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच, नगर परिषदेने 'ॲक्शन मोड'वर येत धडक मोहिम हाती घेतली. पाणीपट्टी न भरल्याने ६ सप्टेंबर रोजी ३१ जणांची नळजोडणी खंडीत केली असून, थकीत ग्राहक नगर परिषदेच्या रडारवर आले आहेत. नगर पालीकेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांनी थकीत मालमत्ता व नळजोडणीधारकांचे नळ कनेक्शन बंद करण्याची धडक मोहीम ६ सप्टेंबर पासुन सुरु केली. 

या मोहीमेत कर निरीक्षक अब्दुल अजीज यांच्या नेतृत्वात पालिकेच्या दहा कर्मचाऱ्यांचे एक पथक गठीत करण्यात आले. नगरपालिकेच्या वतीने शहरातील थकीत नळ धारकांना वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊन सुद्धा काही मालमत्ता धारक व नळधारक कर भरण्यास तयार नाहीत. परिणामी थकबाकीचा बोजा दिवसागणिक वाढतच चालला आहे. थकित नळ कनेक्शन धारकांना यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. जे नळ कनेक्शन धारक पालिकेच्या वतीने वारंवार नोटीस सूचना देऊन सुद्धा कर भरण्यास तयार नाहीत, अशांचे नळ कनेक्शन बंद करण्याचा सपाटा पालिकेने लावला. 

३१ जणांची नळजोडणी खंडीत ३१ जणांची नळजोडणी खंडीत करण्यात आली. पालिकेच्यावतीने शहरात ध्वनीक्षेपकाद्वारे मालमत्ता व नळधारकांना कर भरण्यासंदर्भात सूचना देण्यात येत आहे. कर विभागाचे कर्मचारी शहरातील प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन थकबाकी मालमत्ता व नळ धारकांकडून कर वसुल करीत आहेत. या मोहीमेत मुख्याधिकारी निलेश गायकवाड, कर निरीक्षक अब्दुल अजीज अब्दुल सत्तार हे स्वत: हजर राहून कर न भरणाऱ्या ग्राहकांची नळजोडणी खंडीत करीत आहेत.

 

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिकाWaterपाणीTaxकर