शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड आगाराच्या रिसोड-मालेगाव बसफेऱ्या केल्या बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 16:36 IST

रिसोड आगाराने रिसोड ते मालेगाव मार्गावरील बससेवा ६ जूनपासून बंद केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याचे कारण समोर करीत रिसोड आगाराने रिसोड ते मालेगाव मार्गावरील बससेवा ६ जूनपासून बंद केली आहे. कोरोनामुळे २४ मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी लागून आहे. लॉकडाऊनमध्ये काही क्षेत्रांमध्ये शिथिलता देण्यात आली. मागील महिन्यात काही अटी, शर्तीवर जिल्ह्यांतर्गत एसटी प्रवासी बसेस वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली. त्यानुसार रिसोड आगारातून रिसोड ते मालेगाव मार्गावर चार बस फेऱ्या सुरू केल्या होत्या. सहाजिकच कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता अपेक्षित प्रवासी बस मध्ये प्रवास करत नव्हते. त्यातच बसफेºया कमी असल्याने व वेळापत्रक नसल्याने प्रवासी हे बसमध्ये प्रवास करण्यास धजावत नव्हते. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता अधिक देण्यात आल्याने १ जूनपासून लोकांची हळूहळू गर्दी वाढत असताना रिसोड आगाराने ६ जूनपासून रिसोड ते मालेगाव मार्गावरील बसफेºया प्रवाशी मिळत नसल्याचे कारण पुढे करून पूर्णत: बंद केल्या. त्यामुळे ज्यांच्याकडे दुचाकी किंवा चारचाकी वाहन नाही अशा प्रवाशांची परवड होत आहे. सध्या खासगी प्रवाशी वाहतुकीस परवानगी नाही. त्यामुळे बºयाच नागरिकांना महामंडळाच्या बसेसचा आधार राहतो. महामंडळाने बससेवा पूर्ववत करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. सोमवारपासून बसफेऱ्या वाढविल्या जातीलप्रवाशांच्या सेवेसाठीच बसेस असून, प्रवाशीहिताला प्राधान्य देण्यात येते. रिसोड ते मालेगाव मार्गावर सुरू असलेल्या बस फेºयांना अपेक्षित प्रवासी मिळत नव्हते. त्यामुळे या मार्गावरील बसफेºया कमी करण्यात आल्या. सोमवारपासून बसफेऱ्या वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे रिसोडचे आगार प्रमुख एस.एस. जगताप यांनी सांगितले. काही काळ लोकांनी एस टी बस मधून प्रवास करण्याचे टाळले. त्यामुळे एसटी बसला प्रवासी मिळत नव्हते हे सत्य आहे. मात्र आता हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने लोक घराबाहेर पडत आहेत. तसेच कामानिमित्त बाहेरगावी सुद्धा जात आहेत. रिसोड आगाराचा बस फेºया बंद करणे हा निर्णय चुकीचा आहे. -विश्वासराव सरनाईक,ग्रामस्थ, दापुरी

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटीShirpur Jainशिरपूर जैनRisodरिसोड