शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीच्या ७५ दोषसिद्ध प्रकरणांतून १.१४ कोटींचा महसूल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 17:18 IST

७५ प्रकरणांत दोष सिद्ध झाल्याने या प्रकरणांतील आरोपींना ठोठावण्यात आलेल्या दंडातून शासनाला १ कोटी १४ लाखांचा महसूल मिळाला आहे.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरातील न्यायालयांत दाखल केलेल्या लाच, अपसंपदा प्रकरणांपैकी जानेवारी २०१८ ते मे २०१९ या दरम्यान ७५ प्रकरणांत दोष सिद्ध झाल्याने या प्रकरणांतील आरोपींना ठोठावण्यात आलेल्या दंडातून शासनाला १ कोटी १४ लाखांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील तीन आरोपींचा समावेश आहे.भ्रष्टाचार व लाचखोरी या दोन बाबीने सर्वसामान्यांची झोप उडविली आहे. ‘लाच’प्रकरणी नोकरीतून निलंबित व वेळप्रसंगी बडतर्फ तसेच तुरूंगवास, दंडाची शिक्षा असतानादेखील ही बाब शासकीय-निमशासकीय अधिकारी-कर्मचारी गांभीर्याने घेत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. पैसा पुढे सरकविला नाही तर ‘सरळ’ असणाºया कामालाही अनेक ठिकाणी ‘वळण’ लावले जाते. कटकटीतून एकदाची सुटका करून घेण्यासाठी काही लाभार्थी संबंधित लाचखोर अधिकारी-कर्मचाºयांची लाचेची मागणी पूर्ण करतात तर काही जण यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवितात. या तक्रारीनुसार सापळा रचून संबंधित आरोपींविरूद्ध कारवाई केली जाते. जानेवारी २०१८ ते १५ मे २०१९ या दरम्यान राज्यभरातील एकूण ७५ प्रकरणांत ९७ आरोपींविरूद्ध दोष सिद्ध झाले आहेत. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील तीन आरोपींचा समावेश असून, या तिनही आरोपींकडून प्रत्येकी १० हजार असा एकूण ३० हजारांचा दंड वसूल केला. राज्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या काळात  एकूण ५६ प्रकरणातील ७५ आरोपींना दंड ठोठावला. या दोषसिद्ध गुन्ह्यातील दंडाची रक्कम एक कोटी १२ लाख ५०० रुपये अशी आहे. १ जानेवारी ते १५ मे २०१९ या कालावधीत १९ प्रकरणांमध्ये २२ आरोपींविरूद्ध दोष सिद्ध झाले असून, दोषसिद्ध गुन्ह्यातील दंडाची रक्कम २ लाख ४० हजार रुपये अशी आहे.

टॅग्स :washimवाशिमAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग