शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे निकाल जाहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 16:52 IST

किन्ही रोकडे येथे अमीर खॉ अलियार खॉ तर चिखलागड येथे तारासिंग राठोड विजयी झाले असून, उर्वरीत १८ ठिकाणी कुणाचाही उमेदवारी अर्जच नसल्याने सदर पदे रिक्त राहिली.

ठळक मुद्दे२० ठिकाणच्या ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार, ७ मे पासून १२ मे पर्यंत त्या-त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज स्विकारण्यात आले. चिखलागड (ता.मंगरूळपीर) आणि किन्ही रोकडे (ता. कारंजा लाड) या दोनच ग्रामपंचायतींमधून नामनिर्देशपत्रे दाखल झाली. निवडणुकीत ९० पुरुष तर ८५ महीला अशा एकूण १७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 

वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, जिल्ह्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यपदाच्या रिक्त जागांसाठी २७ मे रोजी पोटनिवडणुक घेण्यात आली. किन्ही रोकडे येथे अमीर खॉ अलियार खॉ तर चिखलागड येथे तारासिंग राठोड विजयी झाले असून, उर्वरीत १८ ठिकाणी कुणाचाही उमेदवारी अर्जच नसल्याने सदर पदे रिक्त राहिली.

जिल्ह्यातील २० ठिकाणच्या ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार, ७ मे पासून १२ मे पर्यंत त्या-त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज स्विकारण्यात आले. १४ मे रोजी प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी झाली. त्यात जिल्ह्यातील केवळ चिखलागड (ता.मंगरूळपीर) आणि किन्ही रोकडे (ता. कारंजा लाड) या दोनच ग्रामपंचायतींमधून नामनिर्देशपत्रे दाखल झाली. 

दरम्यान, या दोन ग्रामपंचायतींपैकी चिखलागड येथे सदस्यपदासाठी झालेल्या निवडणूकीत तारासिंग गबासिंग राठोड आणि ज्योत्स्ना सुरेश राठोड अशा दोन उमेदवारांमध्ये लढत झाली. यामध्ये तारासिंग राठोड हे विजयी झाले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार ज्योत्स्ना सुरेश राठोड यांना ६२ मते मिळाली तर तारासिंग राठोड यांना १०७ मते मिळाली तसेच ६ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. निवडणुकीत ९० पुरुष तर ८५ महीला अशा एकूण १७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 

कारंजा तालुक्यातील किन्ही रोकडे येथेही सदस्यपदासाठीच पोटनिवडणूक घेण्यात आली. तेथे सै. सादिक सै. अमानऊल्ला आणि अमीर खान आरियार खान यांच्यात लढत झाली. एकंदरित ३५८ मतदारांपैकी २५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. २८ मे रोजी कारंजा येथे तहसिल कार्यालयात मतमोजणी घेण्यात आली. यामध्ये अमीर खॉ अलियार खॉ यांना १५२ तर प्रतिस्पर्धी सय्यद सादीक सयद अमानुल्ला यांना १०४ मते पडली. त्यामुळे प्रकाश डहाके गटाच्या अमीर खॉ अलियार खॉ यांनी ४८ मतांनी विजय मिळविला. सदर निवडणुकीत दोन मतदारांनी नोटाचा वापर केला. मतमोजणी वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तहसिलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनात निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून शिवानंद कानडे यांनी काम पाहिले. उर्वरीत अंतरखेड व भुलोडा येथील रिेक्त असलेल्या सदस्य पदासाठी तसेच झोडगा येथील  सरपंच पदाच्या रिक्त जागेकरिता विहित मुदतीपर्यंत एकही उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्याने सदर जागा रिक्तच राहिल्या.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत