देशाला समृध्द करण्याची जबाबदारी ग्रामीण युवकांवर -  श्री श्री रविशंकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 03:35 PM2019-02-08T15:35:51+5:302019-02-08T15:41:17+5:30

युवकांनी स्वत:सोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना आणि पर्यायाने देशाला समृध्द करण्यासाठी सज्ज व्हावे, असे सूचक विधान आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू प.पू. रविशंकर यांनी येथे व्यक्त केले.

The responsibility of enriching the country on rural youth - Sri Sri Ravi Shankar | देशाला समृध्द करण्याची जबाबदारी ग्रामीण युवकांवर -  श्री श्री रविशंकर 

देशाला समृध्द करण्याची जबाबदारी ग्रामीण युवकांवर -  श्री श्री रविशंकर 

Next

 

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :  ‘खेड्यात’च खºया भारताची बीज रोवल्या गेली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात नैराश्याचे वातावरण आहे. नैराश्याचे हे मळभ दूर करण्याची जबाबदारी ग्रामीण भागातील युवकांवर येऊन ठेपली आहे. युवकांनी स्वत:सोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना आणि पर्यायाने देशाला समृध्द करण्यासाठी सज्ज व्हावे, असे सूचक विधान आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू प.पू. रविशंकर यांनी येथे व्यक्त केले.
आर्ट आॅफ लिव्हींगच्या प्रोजक्ट भारत प्रकल्पातंर्गत  आंतरराष्ट्रीय व्यक्ती विकास प्रतिनिधी संमेलनात त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी आणि प्रतिनिधींशी संवाद साधला. स्थानिक जी.व्ही.मेहता विद्यालयाच्या प्रांगणात दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम पार पडला. सुमारे अडीच हजार शेतकरी आणि व्यक्ती विकास प्रतिनिधी यासंमेलनात उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांचे निराकरण श्री श्री रविशंकर यांनी केले. यावेळी विचारण्यात आलेले बहुताशं प्रश्न हे शेतीशी निगडीत होते. काही  प्रश्नांवर समुपदेशन करताना श्री श्रींनी सेंद्रीय शेती, आयुर्वेद, कौशल्यविकास, स्वदेशी वस्तू या सारख्या विषयांवर भर दिला. सेंद्रीय पध्दतीने उत्पादीत पिक आर्ट आॅफ लिव्हींगच्यावतीने हमी भावात खरेदी केल्या जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 


 स्वत: उभं रहा; इतरानांही उभं करा!
प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार येतात. दुसºयाच्या मदतीवर विसंबून राहिल्याने, मनुष्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परिणामी, याच एकमेव कारणामुळे  तो मागे राहतो. नैराश्य वाढत जाते. समाजाची हानी होते.  त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांनी आता स्वत: उभं राहीलं पाहीजे आणि इतरांनाही उभं केले पाहीजे. विदर्भातील युवकांमध्ये प्रंचड प्रतिभा आणि कौशल्य आहे. तसेच चिकाटी आणि परिश्रमामध्येही हे युवक मागे नाहीत. त्यामुळे भविष्यात ग्रामीण युवक हेच देशाचा आधार बनणार आहेत.

 
देशातील पहिल्या ‘अ‍ॅस्ट्रोपॅथी’क्लिनिकचे लोकार्पण!

चुकीच्या आहार पध्दतीमुळे देशात आजारांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. या आजारांवर नवनवीन औषधंही उपलब्ध आहेत. मात्र,या औषधांचेही दृष्परिणाम जाणवत आहे. त्यामुळे देशाला एका नव्या पॅथीची गरज असून,  आर्ट आॅफ लिव्हींगच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या.  पहिल्या ‘अ‍ॅस्ट्रोपॅथी’ क्लिनिकचे लोकार्पण शुक्रवारी खामगावात करण्यात आले. यावेळी आगामी काही काळात ही ‘पॅथी’ सर्वांसाठी सुखावह आणि लोकप्रिय ठरेल, असा विश्वासही श्री.श्री रविशंकर यांनी यावेळी व्यक्त केला.
 
पाच हजार युवकांना विशेष प्रशिक्षण!
आगामी काळात जापान येथे होणाºया आॅलम्पिक स्पर्धांसाठी आर्ट आॅफ लिव्हींग संस्था पाच हजार युवकांना कौशल्य विकासाचे धडे देणार आहे. त्यांना जापानिज भाषा शिकविल्या जाईल. चार महिन्यांचे हे विशेष प्रशिक्षण राहील.

 
शेतकºयांच्या मुलांनी शेती उद्योगाकडे वळावे!
काळ बदलत असून भविष्यात शेती उद्योगाला सुगीचे दिवस येणार आहेत. यामध्ये तीळमात्र शंका नाही. त्यामुळे शेतकºयांच्या मुलांनी शेती  आणि शेती पूरक उद्योगांकडे वळावे. पूर्वी शेतकºयांची मुलं डॉक्टर, वकील, इंजिनिअर होत असायचे. मात्र, आता त्याही व्यवसायामध्ये स्पर्धा वाढली आहे. दरम्यानच्या काळात रासायनांच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या शेत जमिनीचा पोत खराब झाला असून, अन्न धान्यातील कस निघाला आहे. त्यामुळे सेंद्रीय शेतीकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. 
 

Web Title: The responsibility of enriching the country on rural youth - Sri Sri Ravi Shankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.