शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मुग पीक प्रात्याक्षिकास शेतकऱ्यांचा प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 17:57 IST

रिसोड : चालु खरिप हंगामात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून  करडा कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने तालुक्यातील बोरखेडी या गावात २५ शेतकºयांच्या शेतात मुग पीक प्रात्याक्षिक घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : चालु खरिप हंगामात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून  करडा कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने तालुक्यातील बोरखेडी या गावात २५ शेतकºयांच्या शेतात मुग पीक प्रात्याक्षिक घेण्यात आले. यावेळी कृषी  विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी निवडक शेतकºयांना मुग लागवडीचे अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण देवून मार्गदर्शन करण्यात आले. कडधान्य पीक प्रात्याक्षिकातील लाभार्थी शेतकºयांच्या शेतावरील मुग पीक प्रात्याक्षिकाचे प्रयोग प्रत्यक्ष पाहता यावे, या हेतुने शनिवार, १८ आॅगस्ट रोजी ग्राम पंचायत कार्यालय, बोरखेडी येथील सभागृहात मूग शेती दिन  व कृषि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सुर्यकांत वामनराव सानप होते. प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.आर.एल.काळे, ग्रा.पं.सदस्य तान्हाजी बुधवंत, तंटामुक्ती अध्यक्ष कैलासराव जायभाये, कृषि विज्ञान केंद्रातील तज्ञ मार्गदर्शक आर.एस.डवरे, एस.के.देशमुख व कृषी  संजीवनी प्रकल्पातील स्वप्नील गरकळ यांची उपस्थिती लाभली. कृविकेच्या प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिकातून साध्य झालेले घटक व त्यातील संदेशांबाबत शेतकºयांना माहिती देण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक तथा पीक संरक्षण तज्ज्ञ आर.एस.डवरे यांनी मुग पिकाचे लागवड तंत्र, एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे फायदे, पीक प्रात्यक्षिकातून शेतकºयांना मिळणारा फायदा तसेच पक्षी थांबे, कामगंध सापळे, टयकोडर्माचा वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून चालु पीक परिस्थीतीत शेतकºयांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.एस.के देशमुख यांनी कृषि विज्ञान केंद्रात शेतकºयांना उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत माहिती देवून ग्रामीण युवकांनी अ‍ॅग्रो पॉलीक्लिनीक व अ‍ॅग्रो बिझनेस या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. क्षेत्र अधिकारी स्वप्नील गरकळ यांनी शेतकºयांच्या शेतावर जावुन सोयाबिन व कापुस पिकावरील मित्र व शत्रु किडीची ओळख व पोक्रा प्रकल्पाची माहिती दिली. तांत्रिक सत्रानंतर ज्ञानेष्वर सोनुने यांच्या मुग पीक प्रात्याक्षिकास शास्त्रज्ञ व शेतकºयांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी शेतकºयांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आर.एस.डवरे यांनी केले; तर आभार .एस.के.देशमुख यांनी मानले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडFarmerशेतकरी