शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; अनेकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:21 IST

Washim Sarpanch Reservation सहाही तहसील कार्यालयात दि. २ फेब्रुवारी रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील   ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी  सहाही तहसील कार्यालयात दि. २ फेब्रुवारी रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये १५ जानेवारी रोजी मतदान पार पडलेल्या बहुतांश ग्रामपंचायतींमधील आरक्षण पूर्वीप्रमाणे राहिल्याने बदलाची आशा असणाऱ्यांचा  हिरमोड झाला, तर काही ठिकाणी झालेल्या बदलांमुळे नव्यांना संधी मिळणार असल्याचेही चित्र   आहे.  सन २०२० ते २०२५ या काळात जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपून निवडणुकीद्वारे नव्याने ग्रामपंचायतींचे कारभारी ठरतील. दरम्यान, जिल्ह्यातील १६३ ग्राम पंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट ते डिसेंबर २०२० दरम्यान संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी निवडणूक पार पडली. १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाल्यानंतर सर्वांचे लक्ष सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले होते. यावर्षी आरक्षण सोडत प्रक्रियेत ग्रामविकास विभागाने बदल केले आहेत. दरवेळी निवडणुकीपूर्वी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येत होती. यामुळे आरक्षित जागेवरून निवडणूक लढताना जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्रासाठी काही जणांकडून चुकीच्या पद्धतीचा अवलंब होत असल्याची बाब निदर्शनात आल्याने, यंदापासून निवडणुकीनंतर सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले          होते.  त्यात डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण काय निघणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर तालुकास्तरावर दि. २ फेब्रुवारी रोजी आरक्षण सोडत काढण्यात                  आली. यामध्ये निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीपैकी बहुतांश ठिकाणी  पूर्वी जाहीर आरक्षणाचीच स्थिती कायम राहिल्याने बदलाची अपेक्षा बाळगून मोर्चेबांधणी करणाऱ्यांचा हिरमोड झाला, तर काही ठिकाणच्या बदलामुळे नव्यांसाठी संधीही            उपलब्ध मिळाल्याचे चित्र                         आहे.         

                                      एस.सी., एस.टी.चे     आरक्षण कायम   अनुसूचित जाती (एस.सी.) व अनुसूचित जमाती (एस.टी.) चे आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात असते. त्यानुसार सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढताना जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करताना २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली असून, निवडणुकीपूर्वी  एस.सी., एस.टी. प्रवर्गासाठी काढलेली आरक्षण सोडत ही लोकसंख्येवर आधारित असल्याने आणि २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येत कोणताही बदल नसल्याने २ फेब्रुवारी रोजी जाहीर एस.सी. व एस.टी.च्या आरक्षणात फारसा बदल झाला नसल्याचे जाहीर आरक्षणावरून दिसून आले. 

आता लक्ष महिला आरक्षणाकडे जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण प्रवर्गनिहाय मंगळवारी जाहीर करण्यात आले. तथापि, ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण असून, तालुकास्तरावर सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढल्यानंतर, जिल्हास्तरावर ४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे महिला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, यात कुणाचा हिरमोड होतो आणि कुणाला लॉटरी लागते, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.   

शिरपुरात इच्छुकांना धक्काजिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि १७ सदस्य संख्या असलेल्या शिरपूर येथील ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडली. त्यापूर्वी या ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निघाले होते. तथापि, निवडणूक आयोगाने हे आरक्षण रद्द केल्याने येथील अनेकांनी सरपंच पदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. आरक्षणात बदल होऊ न आपल्याला संधी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती; परंतु २ फेब्रुवारी रोजी जाहीर आरक्षण सोडतीत शिरपूरचे सरपंच पद पुन्हा अनुसूचित जातीसाठीच जाहीर झाल्याने इच्छुकांना मोठा धक्काच बसला.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच