शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदानासाठी तीन हजार युवकांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 14:41 IST

तीन हजार युवकांनी रक्तदानासाठी नोंदणी केली असून, ५० जणांना वेळेवर रक्तपुरवठा केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : गरजूंना वेळेवर रक्ताचा पुरवठा करण्यासाठी मालेगाव येथील विघ्यहर्ता फाऊंडेशनने १ जानेवारी २०२० रोजी ‘चालती फिरती ब्लड ब्लँके’चा उपक्रम हाती घेतला. १ जानेवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत तीन हजार युवकांनी रक्तदानासाठी नोंदणी केली असून, ५० जणांना वेळेवर रक्तपुरवठा केला.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, गरजूंना वेळेवर रक्त पुरविण्यासाठी अनेकजण पुढाकार घेतात. तरीसुद्धा रक्ताचा पुरवठा हा रुग्णांना आवश्यक असणाऱ्या गरजेपेक्षा कितीतरी कमी आहे. या समस्येचे निराकरण करण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून मालेगाव शहरातील युवकांनी विघ्नहर्ता फाऊंडेशनची स्थापना करीत १ जानेवारी २०२० या नववर्षाच्या शुभपर्वावर ‘चालती-फिरती ब्लड बँक’ उभारली आहे. या माध्यमातून युवकांसह नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले जात आहे. रक्तदात्याची यादी तयार करणे, रक्तगटनिहाय यादी करून ती अद्यावत ठेवणे तसेच गरजूंना ताबडतोब रक्तपुरवठा करणे ही व्यवस्था यामार्फत मालेगाव शहरासह तालुक्यात करण्यात आली आहे. आतापर्यंत तीन हजार जणांनी रक्तदानासाठी नोंदणी केली आहे. या सर्वांची अद्ययावत माहिती संकलित केली असून, रक्तगटनिहाय यादी तयार आहे. रक्तपुरवठ्यासंदर्भातची माहिती अद्ययावत असल्याने गरजू रुग्णांना ताबडतोब रक्तदान करणे, रक्तपुरवठा करणे सोयीचे होत आहे. मालेगाव शहरासह तालुक्यातील गरजूंना वेळेवर रक्तदान करण्यात येत आहे, असे विघ्नहर्ता फाऊंडेशनने स्पष्ट केले. आतापर्यंत गरजू ५० जणांना मोफत रक्तपुरवठा करण्यात आला. या उपक्रमाला मालेगाव शहरासह तालुक्यातील युवक, नागरिकांचे सहकार्य लाभत आहे. यापुढेही नागरिकांनी सहकार्य करावे तसेच नाव आणि रक्तगट नोंदणी करावी, असे आवाहन विघ्नहर्ता फाऊंडेशनने केले.

टॅग्स :washimवाशिमBlood Bankरक्तपेढी