शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागातही जमिन महसूलाची वसुली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 14:50 IST

वाशिम :  संपूर्ण रिसोड तालुका तसेच मालेगाव तालुक्यातील जउळका रेल्वे आणि मानोरा तालुक्यातील उमरी या दोन महसूल मंडळात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर झालेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  संपूर्ण रिसोड तालुका तसेच मालेगाव तालुक्यातील जउळका रेल्वे आणि मानोरा तालुक्यातील उमरी या दोन महसूल मंडळात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर झालेला आहे. दुष्काळी सवलतींची अंमलबजावणी करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी संबंधित यंत्रणांना दिलेले आहेत. तथापि, दुष्काळी भागातही जमिन महसूल वसुलीचा तगादा सुरू आहे तर दुसरीकडे  दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भातही ठोस कार्यवाही नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.यावर्षी राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये तसेच महसूल मंडळांत जून ते सप्टेंबर या दरम्यान पर्जन्यमानाने सरासरी गाठली नाही. अशा दुष्काळी भागातील शेतकºयांसह नागरिकांना दिलासा म्हणून शासनाने दुष्काळी सवलती लागू केलेल्या आहेत. जिल्ह्यातील संपूर्ण रिसोड तालुका तसेच मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे आणि मानोरा तालुक्यातील उमरी या महसूल मंडळात दुष्काळी सवलतींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संबंधित यंत्रणांना दिलेले आहेत. रिसोड तालुक्यातील रिठद महसूल मंडळात महसूल विभागातर्फे शेतकºयांकडून जमिन महसूल वसूल केला जात आहे. जमिन महसूलात सूट असतानाही वसूली सुरू असल्याने शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रिठद येथील नारायणराव आरू यांना जमिन महसूल भरण्यासंदर्भात सूचना मिळाल्याने त्यांनी जमिन महसूलाचा भरणा केला आहे. दुष्काळी सवलती लागू असल्याने जमिन महसूलात सुट मिळालेली आहे. त्यामुळे शेतकºयांकडून जमिन महसूल वसूली करू नये, अशी मागणी पंचायत समिती सदस्य शारदा आरू यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दुसरीकडे परीक्षा शुल्क माफी असल्याने दुष्काळी भागातील दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांनी भरलेले शुल्क परत मिळण्याची कार्यवाहीदेखील संथगतीने सुरू असल्याचे दिसून येते. रिसोड तालुक्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा मिळून जवळपास ५७ शाळा आहेत. या शाळांमध्ये दहावी व बारावीचे जवळपास ९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, या विद्यार्थ्यांंनी परीक्षा शुल्क भरलेले आहे. तसेच जऊळका रेल्वे  व उमरी महसूल मंडळात जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनीदेखील परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे. जवळपास ११ हजार विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क परत मिळण्यासंदर्भात आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही अद्याप पूर्णत्वाकडे आली नाही. शिक्षण विभागाने शाळांकडून विद्यार्थी संख्या, बँके खाते क्रमांक मागविले आहेत. विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक व अन्य माहिती संकलीत करण्याची कार्यवाही शाळास्तरावर सुरू असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीdroughtदुष्काळ