शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या सेवेसाठी खासगी डॉक्टर कटिबद्ध-अनिल कावरखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 19:12 IST

खासगी डॉक्टरांची भूमिका यासंदर्भात आयएमएचे वाशिम जिल्हा अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांच्याशी साधलेला हा संवाद...

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रत्येक जण सावधगिरी म्हणून दक्षता घेत आहे. मध्यंतरी खासगी डॉक्टरांनी बाह्यरुग्ण सेवा बंद केल्याने पेच निर्माण झाला होता. शेवटी जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक,  इंडियन मेडीकल असोसिएशन (आयएमए), निमा संघटनेच्या चर्चेतून खासगी डॉक्टरांनी २७ मार्चपासून रुग्णसेवा सुरू केली. कोरोना विषाणू संसर्ग, घ्यावयाची दक्षता, खासगी डॉक्टरांची भूमिका यासंदर्भात आयएमएचे वाशिम जिल्हा अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांच्याशी साधलेला हा संवाद...

प्रश्न - कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात काय सांगाल?उत्तर - कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेणे हा एकमेव उपाय आहे. सरकारने ज्या काही उपाययोजना सांगितले, निर्णय घेतले त्याची तंतोतंत अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे अन्यथा संपूर्ण मानवजातीला संसर्ग होण्यास फारसा वेळ लागणार नाही. इटली, अमेरिका यासारख्या प्रगत देशांनी कोरोना विषाणूसमोर हात टेकले आहेत. त्यामुळे आपण कोरोना विषाणू संसर्गाला गांभीर्याने घेऊन ‘लॉक डाऊन’च्या काळात घरातच राहणे आवश्यक आहे.

प्रश्न - मध्यंतरी खासगी डॉक्टरांनी बाह्यरुग्ण तपासणी बंद केली होती, यासंदर्भात काय सांगाल?उत्तर -कोरोना विषाणूसंदर्भातील रुग्णांवर उपचार करताना काही डॉक्टरांना जीव गमवावा लागला. संरक्षण किट द्यावी, अशी डॉक्टरांची मागणी होती. यासंदर्भातील जिल्हाधिकाºयांनी डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाºयांशी सकारात्मक चर्चा केली. रुग्णसेवा लक्षात घेता २७ मार्चपासून खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले आहेत. रुग्णांनीदेखील मास्क लावून, अन्य दक्षता घेऊन व आवश्यकता असेल तरच सोबत एका नातेवाईकाला घेऊन रुग्णालयात यावे.

प्रश्न - कोरोनासंदर्भात कोणती दक्षता घ्यावी?उत्तर -मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे,  अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गेल्यानंतर विशिष्ट अंतर राखून उभे राहणे, घराबाहेर न पडणे आदी दक्षता घेणे आवश्यक आहे.

प्रश्न -  संरक्षक किटचा प्रश्न कसा हाताळणारउत्तर - रुग्णसेवा देताना डॉक्टरांना संरक्षक किट आवश्यक आहे. सध्या मार्केटमध्ये संरक्षक किट उपलब्ध नाही. मार्केटमध्ये संरक्षक किट उपलब्ध झाली तर इंडीयन मेडीकल असोसिएशनच्यावतीने संरक्षक किट खरेदी करण्याचा मानस आहे. ही संरक्षक किट खासगी डॉक्टरांना उपलब्ध करून देण्यात आली. यासोबत संरक्षक किटबाबत जिल्हा प्रशासनाशी चर्चाही केली आहे. ही चर्चा सकारात्मक असून, यावर विचार केला जात आहे. शेवटी रूग्णांची सेवा करण्याºया डॉक्टरांची सुरक्षितताही महत्वाचीच आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस