शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 15:08 IST

लैंगीक अत्याचार प्रकरणी २० वर्षे शिक्षा देण्याचा हा पहिलाच अभूतपूर्व निकाल आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार करणारा आरोपी नंदु उर्फ गजानन वामन भिंगारदिवे (५०) याला वाशिम येथील तदर्थ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. रचना तेहरा यांनी २० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा २४ फेब्रुवारी रोजी सुनावली.पिडीतेच्या आईने वाशिम शहर पोलीस स्टेशनला १३ जानेवारी २०१८ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलगी ही परिवारासह आरोपीच्या घराशेजारी भाड्याने राहत होती. घटनेच्या दिवशी दुपारी ३.३० वाजता पिडीत मुलगी ही आवारात खेळण्यास गेली असता, सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत पिडीत घरी परत आली नाही. शोधाशोध केली असता, अरोपीच्या घराच्या वरच्या मजल्यावरुन घाबरलेल्या अवस्थेत ती दिसून आली. विचारपूस केली असता, पिडीतीने सर्व घटनाक्रम आईला सांगितला. यावरून आरोपीविरूद्ध भांदवी ३७६ (आय), ३७७ तसेच पोक्सो कलम ४,१२, नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. तपास अधिकारी अस्मिता मनोहर यांनी विद्यमान न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे एकुण ४ साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. सबळ पुरावे आढळुन आल्यामुळे तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. रचना तेहरा यांनी कलम ३७६ (आय) न ुसार २० वर्ष सक्तमजुरी व ५ हजार दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिने शिक्षा तसेच कलम ३७७ मध्ये ७ वर्ष सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने सक्तमजुरी तसेच पोक्सो १२ नुसार १ वर्ष सक्तमजुरी, २ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना सक्तमजुरी शिक्षा सुनावली. लैंगीक अत्याचार प्रकरणी २० वर्षे शिक्षा देण्याचा हा पहिलाच अभूतपूर्व निकाल आहे. सरकार पक्षाचे वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता माधुरी मिसर यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून तृप्ती पाटील यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय