शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ९३२० पीक विमाधारकांना परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 11:49 IST

Agriculture, Crop insurance, Washim District जिल्ह्यातील १ लाख ४८ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा काढला आहे. 

वाशिम: जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसामुळे काढणी पश्चात सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. यात पीकविमाधारक शेतकऱ्यांचा समावेश असून, परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानापोटी जिल्हाभरातील ९३२०  शेतकऱ्यांनी कृषी विभाग, पीकविमाकंपनीकडे नुकसानभरपाईसाठी २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज केले आहेत. त्यापैकी ४६३८ शेतकऱ्यांच्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, हे प्रमाण जवळपास ५० टक्के आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४८ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा काढला आहे. सोयाबीन काढणी सुरू झाली असतानाच परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले. त्यामुळे काढणी करून ठेवलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. यात ९३२० शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केले. त्यात आॅनलाईन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ८४३०, तर आॅफलाईन पद्धतीने अर्ज करणाऱ्यां शेतकऱ्यांची संख्या ८९० आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार आजवर ४६३८ शेतकऱ्यांच्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

परतीच्या पावसामुळे झालेल्या सोयाबीन पीक नुकसानाबाबत ९ हजारांहून अधिक अर्ज पीकविमा कंपनी आणि कृषी विभागाकडे प्राप्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी सर्वेक्षण करीत आहेत. आजवर ४६३८ शेतकऱ्यांच्या नुकसानाचे सर्वेक्षण त्यांनी केले आहे.           -शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीwashimवाशिमFarmerशेतकरी