शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये पावसाची हजेरी; पिकांना आधार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 15:41 IST

वाशिम: जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी दुपारच्या सुमारास हजेरी लावली. पाण्याअभावी सुकत चाललेल्या पिकांना या पावसामुळे आधार मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी दुपारच्या सुमारास हजेरी लावली. पाण्याअभावी सुकत चाललेल्या पिकांना या पावसामुळे आधार मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.वाशिम जिल्ह्यात यंदा आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत वार्षिक सरासरीच्या ९२ टक्के पावसाची नोंद झाली होती; परंतु सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. यामुळे शेतजमिनी कोरड्या पडून पिके सुकू लागली. उडिद, मुग ही पिके काढणीवर आली असली, तरी सोयाबीन, तूर आणि कपाशी या दिर्घकालीन पिकांना पाण्याची गरज असल्याने पावसाअभावी ही पिके सुकू लागली होती. अनेक ठिकाणी, तर पावसाअभावी सोयाबीनच्या शेंगाही सुकत चालल्या होत्या. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशात शनिवार १५ सप्टेंबर रोजी दुपारी अचानक आकाशात ढग जमले आणि काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. पाऊस जोराचा नसला तरी, रिमझीम रुपात पडलेल्या या पावसामुळे पिकांना मोठा आधार मिळाला असून, शेतकरी वर्गात या पावसामुळे थोडाफार आनंद निर्माण झाला आहे.  उडिद, मुग काढणाºयांची त्रेधा-तिरपिटवाशिम तालुक्यात उडिद आणि मुग या पिकाची काढणी सुरू असून, शेतकरी या पिकांच्या काढणीची लगबग करीत आहेत. शनिवारी बहुतांश शेतात मळणी यंत्राद्वारे या पिकांची काढणी सुरू असताना अचानक दुपारी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकºयांची चांगलीच त्रेधा तिरपिट उडाली. उडिद, मुग भिजून पुन्हा खराब होऊ नये म्हणून शेतकºयांची झाकझूक करण्यासाठी एकच धांदल पाहायला मिळाली.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस