शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video : वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात साचले पावसाचे पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 18:43 IST

वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका गळक्या स्वच्छतागृहामधून वॉर्ड क्रमांक ३० मध्ये चक्क पावसाचे पाणी शिरल्याने उपचारार्थ भरती असलेल्या रुग्णांची त्रेधातिरपीट उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात शनिवार, २२ जून रोजी प्रथमच जोरदार पाऊस झाला. यादरम्यान वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका गळक्या स्वच्छतागृहामधून वॉर्ड क्रमांक ३० मध्ये चक्क पावसाचे पाणी शिरल्याने उपचारार्थ भरती असलेल्या रुग्णांची त्रेधातिरपीट उडाली. सोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयाचा गचाळ कारभार यामुळे पुन्हा एकवेळ चव्हाट्यावर आला.गोरगरिब कुटूंबातील सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणसाठी उभारण्यात आलेले वाशिममधील २०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय या ना त्या कारणांनी नेहमीच चर्चेत असते. दैनंदिन स्वच्छतेकडे आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णालयामधील सर्वच वॉर्डांमधील स्वच्छतागृह अक्षरश: घाणीने माखली आहेत. जैव वैद्यकीय कचºयाची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी रुग्णालय परिसरात त्याचे ढिगार साचत आहेत. यातही कळस म्हणजे २२ जून रोजी झालेल्या पावसाचे पाणी गळक्या स्वच्छतागृहामधून चक्क रुग्ण भरती असलेल्या वॉर्ड क्रमांक ३० मध्ये शिरल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची पुरती गैरसोय झाली. या गंभीर प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाप्रती सर्वच स्तरातून रोष व्यक्त होत आहे.

 

जिल्हा सामान्य रुग्णालयातील ड्रेनेज ब्लॉक झाल्याने २२ जून रोजी वॉर्ड क्रमांक ३० मध्ये पावसाचे पाणी साचले. ड्रेनेजचे काम करण्यासाठी शासनाकडून ४६ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे; मात्र निविदा प्रक्रिया राबवून हे काम पूर्ण करण्यास विलंब लागणार आहे.- डॉ. बालाजी हरणअतीरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस