शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ला दिली जातेय बगल; जनजागृती शून्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 15:14 IST

वाशिम : दिवसेंदिवस पर्जन्यमानात मोठी घट होत असल्याने शासनाने प्रत्येक कार्यालयाच्या छतावर ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’ करणे सक्तीचे केले. मात्र, गत दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळसदृष स्थिती उद्भवत असतानाही याविषयी समाजात कुठेच जनजागृती होत नसल्याचे दिसत आहे. तथापि, आगामी पावसाळ्यापुर्वी प्रशासकीय इमारतींसह शाळा-महाविद्यालये आणि नागरिकांच्या घरांवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची व्यवस्था करून ...

ठळक मुद्दे प्रशासकीय इमारतींवर ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ करणे अनिवार्य आहे.दुष्काळसदृष स्थिती उद्भवत असतानाही याविषयी समाजात कुठेच जनजागृती होत नसल्याचे दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने व्यापक मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

वाशिम : दिवसेंदिवस पर्जन्यमानात मोठी घट होत असल्याने शासनाने प्रत्येक कार्यालयाच्या छतावर ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’ करणे सक्तीचे केले. मात्र, गत दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळसदृष स्थिती उद्भवत असतानाही याविषयी समाजात कुठेच जनजागृती होत नसल्याचे दिसत आहे. तथापि, आगामी पावसाळ्यापुर्वी प्रशासकीय इमारतींसह शाळा-महाविद्यालये आणि नागरिकांच्या घरांवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची व्यवस्था करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिममध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण रुग्णालय,  पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय, पंचायत समिती, नगर पालिका , ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, विश्रामगृह, बसस्थानक अशा सर्व ठिकाणच्या छतांवर ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ करणे अनिवार्य आहे. मात्र, बहुतांश इमारतींवर ही व्यवस्था नसल्याचे दिसून येत आहे. इमारत बांधकामानंतर पडताळणीचा विसर...जिल्ह्यात कुठेही नवीन इमारत बांधकामाला परवानगी देत असताना इमारतीच्या छतावर रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार असल्याचा करार करणे बंधनकारक आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. यासह बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ केले आहे की नाही, याचीही प्रशासनाकडून पडताळणी केली जात नाही. 

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसWaterपाणी