शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Rain: वाशिम जिल्ह्यात परतीच्या पावसाचे तांडव; सहा मंडळात अतिवृष्टी

By दादाराव गायकवाड | Updated: October 6, 2022 14:31 IST

Rain: वाशिम जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून परतीच्या पावसाने तांडव घातले. अनेक भागांत रात्रभर धो-धो पाऊस कोसळला कोसळला. हवामान खात्याच्या अहवालानुसार जिल्ह्यात बुधवार ५ ऑक्टोबरच्या सकाळपासून ते गुरुवार ६ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंतच्या २४ तासांत सहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

- दादाराव गायकवाड वाशिम - जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून परतीच्या पावसाने तांडव घातले. अनेक भागांत रात्रभर धो-धो पाऊस कोसळला कोसळला. हवामान खात्याच्या अहवालानुसार जिल्ह्यात बुधवार ५ ऑक्टोबरच्या सकाळपासून ते गुरुवार ६ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंतच्या २४ तासांत सहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात मंगरुळपीर आणि वाशिम तालुक्यातील प्रत्येकी तीन मंडळांचा समावेश आहे. जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९.०० मि.मी. पाऊस अपेक्षीत असताना या कालावधित ८४५.९० मि.मी. पावसाची नोंद झाली. अर्थात पावसाळ्याच्या दिवसांत सरासरीपेक्षा ७ टक्के अधिक पाऊस पडला. त्यानंतर आता परतीच्या पावसाने जिल्ह्यात तांडव घालण्यास सुरुवात केली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यापासून परतीच्या पावसाचा जोर जिल्ह्यात वाढत आहे. त्यात बुधवार ५ ऑक्टोबरच्या सकाळपासून ते गुरुवार ६ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंतच्या २४ तासांत मंगरुळपीर, मानोरा, कारंजा आणि वाशिम या चार तालुक्यात धो-धो पाऊस कोसळल्याने वाशिम आणि मंगरुळपीर तालुक्यातील प्रत्येकी ३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर, राजगाव आणि केकत उमरा, तर मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव, पोटी आणि धानोरा महसूल मंडळाचा समावेश आहे.हजारो हेक्टरमधील सोयाबीनला फटकाजिलह्यात बुधवार आणि गुरुवारदरम्यानच्या २४ तासांत पडलेल्या जोरदार पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीनसह इतर पिकांना फटका बसला. त्यामुळे शेतकरी पुन्हा हवालदील झाला आहे. या पीक नुकसानाचे पंचनामे करून शासनाकडून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.मालेगाव, रिसोड तालुक्यात प्रमाण कमीवाशिम जिल्ह्यात त बुधवारी रात्रीपासून अनेक भागांत रात्रभर धो-धो पाऊस कोसळला कोसळला. त्यात मंगरुळपीर, मानोरा, कारंजा आणि वाशिम तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक होते. त्या तुलनेत रिसोड आणि मालेगाव तालुक्यात मात्र पावसाचे प्रमाण थोडे कमी होते.या मंडळात झाली अतिवृष्टीमंडळ - पडलेला पाऊस (मि.मी.)पार्डी टकमोर ९१.३०राजगाव ८५.८०केकत उमरा ७७.००आसेगाव १२९.५०पोटी ७८.००धानोरा ९५.००

टॅग्स :Rainपाऊसwashimवाशिम