शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

धरणांच्या देखभाल, दुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 09:57 IST

धरणांमधून होणाऱ्या अवैध उपशावरही नियंत्रण मिळविणे कठीण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये १ एप्रिल २०१६ पासून सिंचन शाखा कार्यान्वित करण्यात आल्या; मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या पुरेशा मनुष्यबळाची पुर्तता चार वर्षानंतरही झालेली नाही. यामुळे सिंचन व्यवस्थापनासह धरणांच्या देखभाल, दुरूस्तीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. सोबतच धरणांमधून होणाऱ्या अवैध उपशावरही नियंत्रण मिळविणे कठीण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये ९ मोठे, २४ मध्यम आणि जवळपास ४७५ लघू प्रकल्प आहेत. या धरणांमधून प्रामुख्याने रब्बी हंगामातील पिकांना कालव्यांव्दारे तथा उपसा सिंचन पद्धतीने पाणी पुरविले जाते. दरम्यान, धरणांमधील पाणीसाठ्याच्या उपशावर नियंत्रण राहावे, सिंचनासाठी पाणी देत असताना प्रकल्पांचे व्यवस्थापन चोखरित्या सांभाळले जावे, धरणांच्या देखभाल-दुरूस्तीचा प्रश्न उद्भवल्यास तो तत्काळ सुटावा, धरणांची पातळी मोजणे आणि पाणीपट्टी वसूलीला गती मिळणे, आदी उद्देशांनी शासनाने १ एप्रिल २०१६ पासून सिंचन शाखा कार्यान्वित केल्या. त्यासाठी स्वतंत्ररित्या उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहायक अभियंता, विभागीय लेखापाल, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, टंकलेखक, लघूलेखक, संगणक चालक, वाहनचालक, स्थापत्य अभियांत्रीकी सहायक, दप्तर कारकून, कालवा निरीक्षक, मोजणीदार, कालवा टपाली, संदेशक नाईक, शिपाई, काल वा चौकीदार आदी पदांची गरज भासत असताना पुरेसे मनुष्यबळ अद्याप मिळालेले नाही. परिणामी, समस्या ‘जैसे थे’ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाशिम जिल्ह्यात १० सिंचन शाखा कार्यान्वित आहेत; मात्र त्यात ९४ पदे रिक्त असल्याने कामे प्रभावित होत आहेत. तीनच दिवसांपूर्वी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवून किमान कंत्राटी तत्वावर तरी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, अशी मागणी नोंदविण्यात आली आहे.- प्रशांत बोरसेकार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प