शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

पाणंद रस्त्यांचा प्रश्न रखडला; शेतकरी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 11:25 IST

The question of farmland roads lingered : कोरोनाच्या काळात पाणंद रस्त्यांसाठी निधीच नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम : पाणंद रस्त्यांचा प्रश्न अद्याप निकाली निघाला नसल्याने, पावसाळ्याच्या दिवसात शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. कोरोनाच्या काळात पाणंद रस्त्यांसाठी निधीच नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.शेतकऱ्यांना नानाविध समस्यांना सामोरे जात शेती फुलवावी लागते. कधी नैसर्गिक तर कधी मानवनिर्मित संकटांचा सामना करता-करता, शेतकरी थकूनही जातो. पावसाळ्यात पीक पेरणी, शेती मशागत, शेतमाल घरी आणणे आदींसाठी शेतात जाण्याकरिता खडीकरणाचा पाणंद रस्ता असावा, अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा असते. मात्र, दीर्घ कालावधीनंतरही अपेक्षापूर्ती होत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते. जिल्ह्यातील जवळपास २०० पेक्षा अधिक पाणंद रस्त्यांना खडीकरणाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाळ्यात पाऊस आला की, पाणंद रस्ते चिखलमय होत असल्याने, चिखल तुडवतच शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. अशा बिकट परिस्थितीत शेतमाल घरी कसा आणावा, या प्रश्नाने शेतकऱ्यांची झोप उडते. काही ठिकाणी तर पाणंद रस्त्यांअभावी वेळेवर शेतमाल घरीही आणता येत नाही. रस्त्यावरील चिखल नाहीसा झाल्यानंतर, शेतमाल घरी आणावा लागतो. पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण व खडीकरण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधीच तरतूद होणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. मात्र, गत दीड वर्षांपासून कोरोनाच्या काळात निधीची तरतूद नसल्याने हा प्रश्न रेंगाळला आहे. शेतात चिखल तुडवत जावे लागत असल्याने, शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

खडीकरणाचा पाणंद रस्ता नसल्याने शेतात जाताना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने याचा त्रास इतर शेतकºयांना सहन करावा लागत आहे.- प्रवीण सरनाईक, शेतकरी, रिसोड 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी