शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात १.२२ लाख चिमुकल्यांना देणार पल्स पोलिओ डोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 11:45 IST

Pulse polio Vaccine जिल्ह्याला १ लाख ५४ हजार डोज प्राप्त झाले असून १ लाख २२ हजार ३५७ बालकांना डोज देण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : यावर्षी १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेस सुरूवात झाल्याने लांबणीवर पडलेली पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ३१ जानेवारी रोजी राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्याला १ लाख ५४ हजार डोज प्राप्त झाले असून १ लाख २२ हजार ३५७ बालकांना डोज देण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १२ लाख ४१ हजार ५६३ असून सुमारे २ लाख ४४ हजार ४७४ घरे आहेत. शहरी भागात ३४ हजार ९२१ आणि ग्रामीण भागात ८७ हजार ४६३ असे एकंदरीत १ लाख २२ हजार ३५७ बालके शून्य ते पाच वयोगटातील आहेत. त्या सर्वांना येत्या ३१ जानेवारी रोजी पोलिओचा डोज दिला जाणार आहे. या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ९७५ बुथवर पोलिओ डोज दिला जाणार आहे. या मोहिमेसाठी १४५ आरोग्य सेवक, १९७ पर्यवेक्षक, २५ आरोग्य संस्था, ३० मोबाईल पथक आणि १३९ ट्रान्झिस्ट पथक कार्यान्वित करण्यात आले आहेत. ३१ जानेवारी रोजी पोलिओ बुथवर न आलेल्या बालकांना २ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत सर्वेक्षणातून शोध घेऊन पोलिओचा डोज पाजला जाणार आहे. त्यासाठी १७१५ कर्मचाऱ्यांची चमू कार्यरत राहणार आहे. सदर मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय विभाग व जनतेचा सहभाग आवश्यक आहे. सहा तालुक्यांसाठी सहा खातेप्रमुख नियुक्त करण्यात आले असून, गट विकास अधिकारी यांना प्रत्येक गावासाठी एक कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

कोरोना लसीकरण मोहिमेमुळे विलंब झालेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेस ३१ जानेवारीपासून सुरूवात केली जात आहे. त्यासाठी ९७५ बुथ कार्यान्वित करण्यात आले असून त्यावर शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओचा डोज दिला जाणार आहे. याशिवाय जी बालके यादिवशी डोस घेणार नाहीत, त्यांना पुढील पाच दिवस घरोघरी जाऊन डोस दिला जाणार आहे.- डॉ. अविनाश आहेर,  जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य