शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावला चाकातीर्थ प्रकल्पातून पाणी पुरवठय़ाचा प्रस्ताव धूळ खात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 01:20 IST

मालेगाव : शहराला पाणी पुरवठा करणार्‍या कुरळा लघुपाटबंधारे प्रकल्पातील जलसाठय़ात झपाट्याने घट होत असून, आगामी महिनाभर पुरेल, एवढाच जलसाठा सध्या शिल्लक राहिला आहे.

ठळक मुद्देपाणी प्रश्न होणार गंभीर कुरळा प्रकल्पात उरला जेमतेम जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : शहराला पाणी पुरवठा करणार्‍या कुरळा लघुपाटबंधारे प्रकल्पातील जलसाठय़ात झपाट्याने घट होत असून, आगामी महिनाभर पुरेल, एवढाच जलसाठा सध्या शिल्लक राहिला आहे. दुसरीकडे चाकातीर्थ प्रकल्पावरून कुरळा धरणात पाणी सोडण्याचा प्रश्नही प्रलंबित असल्याने २५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या मालेगाव शहराचा पाणी प्रश्न आतापासूनच गंभीर झाला असून, लवकर प्रभावी उपाययोजना न केल्यास पाण्यासाठी हाहाकार माजणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कुरळा लघुपाटबंधारे प्रकल्पावरून शहरास पाणी पुरवठा केला जातो. यावर्षी मात्र पर्जन्यमान घटण्यासोबतच प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे धरणातून अवैधरीत्या पाणी उपसा झाला. त्यामुळे जलसाठय़ात झपाट्याने घट झाली. सध्या तलावात पुढील एक महिना पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे.दरम्यान, पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता मालेगावला चाकातीर्थ लघुपाटबंधारे प्रकल्पावरून पुरक पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव नगर पंचायतने जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. त्यास मात्र अद्याप मंजुरात मिळाली नसून, आगामी महिनाभरात प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्ष काम पूर्ण न झाल्यास मालेगावकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेन, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मालेगाव शहरातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी चाकातीर्थ लघुपाटबंधारे तलावातून कुरळा लघुपाटबंधारेच्या विहिरीत पाणी आणावे लागणार आहे. त्यासाठी तात्पुरत्या पूरक पाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी १0 लाख रुपये अंदाजित खर्चाचा प्रस्ताव जिल्ह्याधिकार्‍यांनी मंजूर केला असून, पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविल्याची माहिती आहे. कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनेचा चाकातीर्थ ते मालेगाव शहर असा ३४ कोटी रुपये अंदाजित खर्चाचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला आहे. दोन्ही प्रस्तावांना मात्र अद्याप शासनाची मंजुरात मिळालेली नाही.- मीनाक्षी परमेश्‍वर सावंत, नगराध्यक्ष, मालेगाव

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी