शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’ संबंधित तक्रारीसाठी ५०० रुपये शुल्काचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 15:05 IST

तक्रारींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव महामंडळाकडे सादर करण्यात आला आहे.  

लोेकमत न्यूज नेटवर्क वाशिम: चालक किवा वाहकांकडून होणारा नियमांचा भग, तसेच प्रवाशांना येणाºया विविध अडचणींबाबत राज्य परिवहन महामंडळाकडे (एसटी) असंख्य तक्रारी येतात. यातील बहुतांश तक्रारी निरर्थक असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. अशा तक्रारींच्या चौकशीत उगाच वेळ खर्च होतो. त्यामुळे तक्रारींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव महामंडळाकडे सादर करण्यात आला आहे.  राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेºया अनियमित असणे, तिकिटासाठी वाहकांकडून प्रवाशांसोबत वाद होणे, नियोजित थांब्यावर बस न थांबविणे, सवलतीच्या तिकिटास नकार देणे, तसेच अकारण कोठेही बस थांबविणे, आदि प्रकारांबाबत प्रवासी एसटी महामंडळाचे आगारप्रमुख अथवा विभागीय नियंत्रकांकडेही तक्रारी करीत असतात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि त्यांचे समाधान व्हावे म्हणून एसटी महामंडळाचे संबंधित अधिकारी अशा तक्रारींची चौकशीही करतात. तथापि, चौकशी केल्यानंतर बहुतांश तक्रारी खोट्या असल्याचे आढळून येते. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अधिकाºयांचा आणि संबंधित वाहक, चालकाचाही यामुळे अनावश्यक वेळ खर्च होतो. ही बाब टाळण्यासाठी एसटी महामंडळाकडे तक्रारीसाठी ५०० रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार  प्रवाशाला तक्रार करताना ५०० रुपये रक्कम रितसर भरायची आहे.  शुल्क भरले, तरच तक्रार ग्राह्य धरून चौकशी करण्यात येईल आणि या चौकशीत तथ्य आढळले नाही, तर प्रवाशाची रक्कम परत मिळू शकणार नाही. तथापि, असा कुठला प्रस्ताव मंजूर झाला नसल्याचे मंगरुळपीर आगार प्रमुख अकिल मिर्झा यांच्याकडून कळले आहे.

टॅग्स :washimवाशिमstate transportराज्य परीवहन महामंडळ