शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळेवरील शिक्षकांना ज्येष्ठतेनुसार मिळणार पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 16:13 IST

 मालेगाव - खासगी अनुदानित शाळातील डीएड पदवीधर शिक्षकांना आवश्यक पात्रता मिळविल्यानंतरही पदोन्नतीपासून दूर रहावे लागत होते. आता अशा पदवीधर शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेप्रकरणी शिक्षण विभागाने सुधारणा केली आहे.

ठळक मुद्देअटींमुळे पदवीधर डीएड  शिक्षकांनी आवश्यक पात्रता  मिळविल्यानंतरही त्यांना पदोन्नती पासून दूर रहावे लागत होते. पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्टता सूची बाबत स्पष्टीकरणात्मक आदेश शिक्षण विभागाने काढला आहे.शिक्षकांची जेष्ठता कोणत्या तारखेपासून करावी याच्या मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला मिळाल्या आहेत.

 मालेगाव - खासगी अनुदानित शाळातील डीएड पदवीधर शिक्षकांना आवश्यक पात्रता मिळविल्यानंतरही पदोन्नतीपासून दूर रहावे लागत होते. आता अशा पदवीधर शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेप्रकरणी शिक्षण विभागाने सुधारणा केली आहे. त्यानुसार  डीएड पदवीधर शिक्षकांना न्याय मिळणार आहे.

डीएड पात्रता धारण करणाº्या शिक्षकांना उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक पदावर पदोन्नती देताना किचकट प्रक्रिया होती. महाराष्ट्र राज्य खाजगी शाळेतील कर्मचारी नियमावली १९८१ अनुसूची नियम १२ एफ मधील तरतुदीनुसार प्रवर्ग मध्ये अंतर्भाव होण्यासाठी सदर प्रवर्गातील विहित केलेल्या अर्हता धारण करणे आवश्यक होते. या प्रवर्गातील संदिग्ध शैक्षणिक पात्रतेच्या अटींमुळे पदवीधर डीएड  शिक्षकांनी आवश्यक पात्रता  मिळविल्यानंतरही त्यांना पदोन्नती पासून दूर रहावे लागत होते. त्यामुळे यात बदल करण्याच्या मागणीसाठी अनेक वर्षापासून प्रयत्न सुरु होते. बीएड पात्रता प्रथम धारण करणाºयांना पदोन्नतीत प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे सेवाश्रेष्ठ असलेल्या पदवीधर डीएड शिक्षकांना सेवाज्येष्ठता व पदोन्नती नाकारली जात होती. या संदर्भात विविध संघटनांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्टता सूची बाबत स्पष्टीकरणात्मक आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. पदवीधर शिक्षकांची जेष्ठता यादी मध्ये शिक्षकांची जेष्ठता कोणत्या तारखेपासून करावी याच्या मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला मिळाल्या आहेत. त्यानुसार या निकषांवर या शिक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत जुन्या पद्धतीने पदोन्नती दिल्या. मात्र आता या परिपत्रकाने काही बाबींसंदर्भात संभ्रम असल्याचा सूर काही शिक्षकांमधून उमटत आहे. 

परिपत्रकानुसार झालेले बदल सामाईक ज्येष्ठता सूची ही पदोन्नतीच्या प्रयोजनार्थ विचारात घेण्यात यावी. पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित शिक्षकाचा पदवीधर शिक्षकांच्या यादीमध्ये समावेश होईल. सदर यादीतील त्यांची ज्येष्ठता तारीख ही अखंड सेवेतील शिक्षक पदावर प्रथम नियुक्तीची तारीख राहील. शिक्षक संवर्गात प्रथम नियुक्ती तारीख व अखंड सेवा विचारात घेऊन तयार करण्यात आलेली सामाईक ज्येष्ठ सुची पद्धतीकरिता विचारात घेण्यात यावी व पद्धतीच्या पदाकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक व व्यावसायिक  अहर्ता अनुभवाच्या अटीसह पदोन्नतीच्या वेळेस संबंधित शिक्षक धारण करीत असेल तर पदोन्नतीसाठी संबंधिताचा विचार करावा. पदोन्नतीकरिता विचारात घ्यावयाची सामाईक ज्येष्ठता सूची ही उच्च प्राथमिक स्तरावर वर्ग सहावी ते बारावीच्या स्तरांकरीताही विचारात घेण्यात यावी.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवTeacherशिक्षक