शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून लांबणीवर: कृषीसेवा केंद्रांवर शुकशुकाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 17:27 IST

वाशिम: मान्सून रेंगाळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतर शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, बियाणे, खतांच्या खरेदीवर त्याचा परिणाम झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मान्सून रेंगाळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतर शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, बियाणे, खतांच्या खरेदीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील कृषीसेवा केंद्रांवर शुकशुकाट पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकºयांनी पेरणीसाठी जमिन सज्ज ठेवली आहे. दुसरीकडे यावर्षीदेखील बहुतांश शेतकºयांची सोयाबीन पेरणीला पसंती राहिल, असा अंदाज गृहित धरून कृषी विभागाने जिल्ह्यातील चार लाख १५ हजार हेक्टवर पेरणीचे नियोजन केले आहे. शेतातील काडीकचरा वेचणे, वखरणी आदी कामे पूर्ण केली असून पेरणीसाठी शेतकºयांनी जमिन सज्ज ठेवली आहे. यावर्षीदेखील बहुतांश शेतकरी सोयाबीनची पेरणी करतील, असा अंदाज कृषी विभागाला आहे. त्या दृष्टिने खरिप हंगामातील पेरणीचे नियोजन केले असून, एकूण चार लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल, असा अंदाज बांधण्यात आला आहे. यापैकी २ लाख ९० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होईल, असे कृषी विभागाने गृहित धरले आहे. ६० हजार हेक्टरवर तूर, २५ हजार हेक्टरवर कपाशी, १५ हजार हेक्टरवर मुग व २० हजार हेक्टरवर उडीद या प्रमुख पिकांच्या पेरणीचा अंदाज आहे. मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाल्यानंतर आणि त्यानंतर संभाव्य पावसाचा अंदाज पाहून शेतकºयांनी पेरणीला सुरूवात करावी. हवामान खात्याचा अंदाज तसेच कृषी विभागाच्या सल्ल्याने शेतकºयांनी पेरणी करावी, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे. आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याने शेतकºयांच्या चेहºयावर चिंतेचे ढग पसरू लागले आहेत. त्यामुळे त्यांनी बियाणे, खतांसह इतर कृषी निविष्ठांची खरेदी स्थगित केली आहे. परिणामी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर शुकशुकाट पसरल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी