कारंजा लाड: मालेगाव पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले ग्रामसेवक संजय शेळके यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेचा निषेध कारंजा तालुका ग्रामसेवक संघटनेच्यावतीने १५ मार्च रोजी करण्यात आला. यावेळी संजय शेळके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तसेच शेळके यांच्या कुटुंबासाठी कारंजा तालुका ग्रामसेवक संघटनेकडून ५१ हजार रुपयांची मदत देण्याचे या सभेत सर्वानुमते ठरविण्यात आले, तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहील, असेही ग्रामसेवकांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. मालेगाव पंचायत समिती अंतर्गत कार्यरत ग्रामसेवक संजय शेळके यांनी वरिष्ठाच्या जाचामुळे कंटाळून आत्महत्या केली. या घटनेचा निषेध म्हणून कारंजा तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांची निषेध सभा पार पडली. शेळके यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्या मुख्य आरोपीस अटक होत नाही, तोपयर्ंत ११ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांचे सुरू असलेले कामबंद आंदोलन सुरूच राहील, असे लेखी पत्र प्रशासनाला दिले.
ग्रामसेवक आत्महत्या प्रकरणाचा कारंजा ग्रामसेवक संघटनेकडून निषेध
By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST