शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना ‘फायर ऑडिट’चा विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 11:19 IST

Washim Hospital News गत दोन वर्षांपासून जवळपास ७० टक्के खासगी रुग्णालयांनी ‘फायर ऑडिट’कडे पाठ फिरविल्याचे समोर आले. 

ठळक मुद्दे जिल्ह्यात नोंदणीकृत २०० खासगी रुग्णालये आहेत.शहरातील केवळ ३२ रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले आहे. उर्वरीत ९२ रुग्णालयांनी फायर ऑडिट केले नाही.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : भंडारा येथील दुर्दैवी घटनेनंतर वाशिम  जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांचा ‘फायर ऑडिट’चा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रविवारी ‘लोकमत’ने रिअ‍ॅलिटी चेक केले असता गत दोन वर्षांपासून जवळपास ७० टक्के खासगी रुग्णालयांनी ‘फायर ऑडिट’कडे पाठ फिरविल्याचे समोर आले. भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता कक्षाला शनिवार, ९ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत दहा अर्भकांचा वेदनादायी मृत्यू झाला. तीन नवजात होरपळून मरण पावले तर सात जणांचा गुदमरून अंत झाला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांतील फायर ऑडिट व अग्निरोधक सिलिंडरची परिस्थिती नेमकी कशी आहे, यासंदर्भात रविवारी ‘रिअ‍ॅलिटी चेक’ केले असता जवळपास ७० टक्के खासगी रुग्णालयांचे गत दोन वर्षांत ‘फायर ऑडिट’च झाले नसल्याचे समोर आले. जिल्ह्यात नोंदणीकृत २०० खासगी रुग्णालये आहेत. यामध्ये सर्वाधिक १२४ रुग्णालये वाशिम शहरातील आहेत. शॉट सर्किटमुळे आगीची घटना घडू नये म्हणून दरवर्षी फायर ऑडिट करणे अनिवार्य आहे. वाशिम शहरातील केवळ ३२ रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले तर उर्वरीत ९२ रुग्णालयांनी फायर ऑडिट केले नाही. फायर ऑडिटसंदर्भात नगर परिषदेने रुग्णालय प्रशासनाला यापूर्वीच नोटीसही बजावल्या. परंतू, रुग्णालयांनी ही बाबही गांभीर्याने घेतली नाही.   रिसोड शहरात जवळपास १८ नोंदणीकृत खासगी रुग्णालये असून, गत दोन वर्षांत एकाही रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याचे नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने स्पष्ट केले. मंगरूळपीर शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही अशीच काहीशी परिस्थिती आहे. मालेगाव शहरातील नोंदणीकृत १० पैकी चार रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले नसल्याची माहिती आहे. कारंजा शहरासह तालुक्यात नोंदणीकृत २५ पैकी जवळपास ८ रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा अद्ययावत नाही. अद्ययावत अग्निशमन यंत्रणा नसलेल्या जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये शॉट सर्किट किंवा अन्य कारणांमुळे आग लागल्यास यावर नियंत्रण कसे मिळविणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 

रिसोड येथे ‘फायर ऑडिट’च नाहीरिसोड शहरातील खासगी रुग्णालयांमधील ‘फायर ऑडिट’संदर्भात नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाकडून माहिती घेतली असता, गत दोन वर्षात एकाही रुग्णालयाने फायर ऑडिटबाबत प्रस्ताव पाठविला नाही. दोन वर्षांपूर्वी फायर ऑडिटबाबत खासगी रुग्णालय प्रशासनाशी पत्रव्यवहार करून ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या; परंतू रुग्णालयांनी फायर ऑडिट केले नाही, असे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, सोमवार ११ जानेवारीपासून फायर ऑडिटबाबत रुग्णालयांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी स्पष्ट केले.

खासगी रुग्णालयांमधील फायर ऑडिट व अग्निरोधक सिलिंडर याबाबत सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. या विषयाच्या अनुषंगाने लवकरच जिल्हास्तरावर आढावा घेण्यात येणार आहे. फायर ऑडिट व अग्निरोधक सिलिंडर यासंदर्भात टाळाटाळ, दिरंगाई करणाऱ्याविरुद्ध शासन नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.- शण्मुगराजन एस.जिल्हाधिकारी वाशिम

वाशिम शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांनी फायर ऑडिट केले आहे. आगीच्या संभाव्य घटना घडू नयेत तसेच आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळावे म्हणून खासगी रुग्णालयांनी ‘फायर ऑडिट’ तातडीने करावे तसेच अग्निरोधक सिलिंडर व्यवस्था अद्ययावत ठेवावी, याबाबत डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली आहे. - डॉ. अनिल कावरखेजिल्हाध्यक्ष, आयएमए, वाशिम 

टॅग्स :washimवाशिमfireआगhospitalहॉस्पिटल