शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

आढावा बैठकीस प्राचार्य अनुपस्थित; २४ महाविद्यालयांना ‘शो-काॅज’!

By सुनील काकडे | Updated: July 10, 2024 15:54 IST

खुलासा सादर करण्याचे निर्देश : तीन दिवसांचा ‘अल्टीमेटम’

सुनील काकडे, वाशिम : जिल्ह्यातील महाविद्यालयांनी इयत्ता ११वीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश करू नये. तसेच ११वी नंतर अन्य महाविद्यालयांतील कुठल्याच विद्यार्थ्यांस इयत्ता १२वीत परस्पर प्रवेश देवू नये, अशी स्पष्ट सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी ९ जुलै रोजी बैठक घेण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील २४ विद्यालयांतील मुख्याध्यापक, प्राचार्य अनुपस्थित राहिले. त्यांच्या नावे त्याचक्षणी कारणे दाखवा नोटीस काढून तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी शहरी भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ११वीत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी १२वीसाठी ग्रामिण भागातील महाविद्यालयांकडे धाव घेत आहेत. हा प्रकार चुकीचा असून त्यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने यापुढे जिल्ह्यातील कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षणाधिकारी कार्यालयाची रितसर पुर्वपरवानगी घेतल्याशिवाय परस्पर प्रवेश देवू नये. विद्यार्थ्याच्या मूळ कनिष्ठ महाविद्यालयास इयत्ता ११वी उत्तीर्ण झाल्याचा दाखला देण्याकरिता पत्र देवू नये. पूर्वपरवानगीशिवाय १२वीत परस्पर प्रवेश दिल्यास असे प्रवेश रद्द करण्यात येतील, असे स्पष्ट निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते.दरम्यान, ६ जुलै रोजी इयत्ता ११वीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. तोपर्यंत झालेले प्रवेश आणि इयत्ता १२वीत नव्याने झालेल्या प्रवेशाचा आढावा घेण्याकरिता ९ जुलै रोजी बैठक घेण्यात आली. मात्र, २४ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य अनुपस्थित राहिले. यामुळे संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. काय नमूद आहे नोटीसमध्ये?इयत्ता ११वी आणि १२वीच्या प्रवेशासंबंधीचा आढावा घेण्याकरिता ९ जुलै रोजी आयोजित बैठकीसंबंधी वेळोवेळी कळवूनही मुख्याध्यापक, प्राचार्य अनुपस्थित राहिले. वरिष्ठांची सूचना आणि शासकीय धोरणांचे पालन न केल्याप्रकरणी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता काढून घेण्याची कार्यवाही का करण्यात येवू नये, असे नोटीसमध्ये नमूद आहे. तीन दिवसांत समाधानकारक खुलासा सादर न केल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांनी नोटीसद्वारे संबंधितांना कळविले आहे.

टॅग्स :washimवाशिम