शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

पोहरादेवीतील नवीन कामांना स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 12:34 IST

नव्याने मंजूर झालेल्या कामांचे कार्यारंभ आदेश रोखण्यात आले असून कामांना तुर्तास स्थगिती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी गुरूवारी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) :  बंजारा समाजाची काशी म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवीला महाराष्ट्रातील इतर प्रसिद्ध देवस्थानांप्रमाणे पायाभूत सुविधा प्राप्त व्हाव्यात, यासाठी तत्कालिन शासनाने कोट्यवधींचा निधी मंजूर केला. त्यातून विकासात्मक कामे सुरु आहेत; मात्र नव्याने मंजूर झालेल्या कामांचे कार्यारंभ आदेश रोखण्यात आले असून कामांना तुर्तास स्थगिती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी गुरूवारी दिली.संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळाने पुणीत झालेल्या पोहरादेवीशी बंजारा समाजातील लाखो भाविकांची श्रद्धा जुळलेली आहे. पोहरादेवीला माथा टेकण्यासाठी लाखो भक्त दरवर्षी येथे येतात. भक्तगणांची सोय व्हावी तथा बंजारा समाजामध्ये धार्मिक महत्त्व असलेल्या नंगारा या पारंपरिक वाद्याच्या प्रतिकृतीसह ‘नंगारा भवन’ बांधण्याचे कामही जोरासोरात सुरू आहे; मात्र नव्याने मंजूर झालेल्या; मात्र कार्यारंभ आदेश न दिलेल्या कामांना शासनाच्या सचिवांनी स्थगिती दिली असून यामुळे भाविकांमुळे नाराजीचा सूर उमटत आहे. पोहरादेवी येथे ज्या नवीन कामाना अद्यापपर्यंत कार्यारंभ आदेश देण्यात आले नाहीत, अशाच कामाना शासनाच्या सचिवांनी स्थगिती दिली आहे. त्यात जुनी मात्र मात्र विनासायास सुरूच राहणार आहेत. नवीन कामांना कार्यारंभ आदेश आणि निधीची तरतूद झाल्यानंतर ही कामे देखील सुरू होतील.- शेषराव बिल्लारीशाखा अभियंता, मानोरा

टॅग्स :washimवाशिम