------------------
बीएसएनएलची कनेक्टिव्हिटी खंडित
वाशिम : गत काही दिवसांपासून भारत संचार निगम लिमिटेडच्या इंटरनेटची कनेक्टिव्हिटी वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे आपले सरकार केंद्रांतील कामे खोळंबून ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
-------
जलस्रोतांची पातळी खालावली
वाशिम : यावर्षी उन्हाळ्यात बहुतांश जलस्रोतांच्या पातळीत लक्षणीय घट झाली. आता पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे कूपनलिका, विहिरींची पातळी खालावल्याचे दिसत आहे.
--------------
पशू लसीकरण रखडले
वाशिम : पावसाळ्याच्या दिवसांत गुरांना होणारे विविध आजार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून गुरांना लसीकरण केले जाते. आता पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी पशू संवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीमच सुरू करण्यात आलेली नाही.
-------