शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींसाठी २४ मार्चला मतदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 15:31 IST

वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी २४ मार्च २०१९ रोजी मतदान होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी २४ मार्च २०१९ रोजी मतदान होणार आहे. मतदान होत असलेल्या सर्व ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रांवर २४ मार्च २०१९ रोजी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.प्रतिबंधात्मक आदेशानुसार २३ मार्च २०१९ रोजी रात्रीनंतर राजकीय पक्षांना सभा घेता येणार नाही. धार्मिक स्थळांचा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपयोग करता येणार नाही. आचारसंहितेच्या संपूर्ण काळात सार्वजनिक ठिकाणी शस्त्र जवळ बाळगता येणार नाही. सभेदरम्यान, मतदानादिवशी मतदान केंद्राच्या ठिकाणी शस्त्र जवळ बाळगता येणार नाही. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या ठिकाणी १०० मीटर परिसरात निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त कोणताही व्यक्ती प्रवेश करणार नाही. राजकीय व कोणत्याही नागरिकांचे हनन होणार नाही. ईव्हीएम मशीन गार्डपासून १०० मीटर परिसरात निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्ती प्रवेश करणार नाहीत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार वाशिम तालुक्यातील एकांबा, अडगाव खु., देवठाणा बु., जांभरुण नावजी, वांगी, सोयता, रिसोड तालुक्यातील भरजहांगीर, मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे, खडकी इजारा, कुत्तरडोह, मुसळवाडी, अमाना, मंगरूळपीर तालुक्यातील मंगळसा, लाठी, चिखली, तपोवन, बिटोडा, इचोरी, मानोरा तालुक्यातील बोरव्हा, चौसाळा, दापुरा बु. दापुरा खु., ढोणी, फुलउमरी, गिरोली, जामदरा घोटी, काली, कोलार, पाळोदी, सोमेश्वरनगर, उमरी बु., उमरी खु. या ३२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक तसेच जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी मतदान होत आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक